Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात 96 मतदारसंघात तब्बल 1717 उमेदवार; महाराष्ट्राची स्थिती काय?

Election Commission of India : निवडणूक आयोगाकडून चौथ्या टप्प्यांतील मतदारसंघनिहाय उमेदवारांची माहिती जाहीर केली आहे. देशातील दहा राज्यांमध्ये चौथ्या टप्प्यांतील निवडणूक होणार आहे.   
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या टप्प्याचे मतदान सात मे तर चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मेला होणार आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही टप्प्यांतील प्रचार शिगेला पोहचला आहे. चौथ्या टप्प्यांत देशातील दहा राज्यांतील 96 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठी तब्बल 1717 उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यांत सर्वाधिक जागा आंध्र प्रदेशात असल्या तरी सर्वाधिक उमेदवार मात्र तेलंगणामध्ये आहेत.    

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. आज पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. तर तिसऱ्या तर चौथ्या टप्प्यातील मतदानाचा दिवस जवळ आला आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची प्रचाराची धामधूम सुरू आहे. (Latest Political News)

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : …ही तर काँग्रेसची रणनीती, अजून काही चाली बाकी!

निवडणूक आयोगाने (Election Commission) चौथ्या टप्प्यांतील उमेदवारांची राज्यनिहाय माहिती प्रसिध्द केली आहे. त्यानुसार या टप्प्यांत दहा राज्यांमध्ये 1717 उमेदवार मैदानात आहेत. एकूण 4264 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 25 एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. छाननीनंतर 1970 अर्ज वैध ठरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चौथ्या टप्प्यात तेलंगणामध्ये (Telangana) 17 मतदारसंघात सर्वाधिक 1488 अर्ज दाखल झाले होते. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशात 1103 अर्ज होते. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीअखेर आंध्र मध्ये 454 तर तेलंगणात सर्वाधिक 525 उमेदवार रिंगणात उरले आहेत. या टप्प्यात या दोन राज्यांसह बिहार (5), जम्मू आणि काश्मीर (1), झारखंड (4), मध्य प्रदेश (8), महाराष्ट्र (11), ओडिशा (4), उत्तर प्रदेश (13), आणि पश्चिम बंगाल (8) या राज्यांत मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) 11 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यामध्ये पुणे, शिरूर, मावळ, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, शिर्डी आणि बीड मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये एकूण 298 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  

Lok Sabha Election 2024
PM Narendra Modi News : राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळताच मोदींनी दिलं आव्हान...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com