Kalyan Lok Sabha: PM मोदींच्या सभेमुळे कल्याणच्या 'या' भागातील वाहतुकीत बदल

PM Narendra Modi News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. अशातच आता पंतप्रधान मोदी यांची उद्या बुधवार (15 मे) रोजी कल्याण पश्चिमेत जाहीर सभा होणार आहे.
Kalyan Lok Sabha Election 2024
Kalyan Lok Sabha Election 2024Sarkarnama

Kalyan Lok Sabha 2024: सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. अशातच आता पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांची उद्या बुधवार (15 मे) रोजी कल्याण पश्चिमेत जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सभा होणाऱ्या ठिकाणाच्या परिसरामधील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. तर वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची अधिसूचना ठाणे शहर पोलिस उपआयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ठाणे, भिवंडी , कल्याण (Kalyan) लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के (Dr. Shrikant Shinde and Naresh Mhaske) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या कल्याणमध्ये येणार आहेत. कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानावर ही जाहीर सभा होणार असून सबेसाठीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सभेसाठी आधारवाडी परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सभेसाठी जवळपास 1 लाखांच्या आसपास लोकं येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळाच्या आसपासच्या परिसरातील वाहतुकीत पोलिसांकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. हे बदल आज (मंगळवार) रात्री 12 वाजल्यापासून उद्यापर्यंत हे बदल लागू असणार आहेत.

कसा असेल वाहतुकीत बदल

या ठिकाणी प्रवेश बंद -

1) आधारवाडी चौक सिग्नल ते गांधारी ब्रिज पावेतो बापगाव संपूर्ण रोड व तसेच या रोडला मिळणारा आतील रोड (कट) येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

ही वाहने वाडेघर सर्कल वाडेघर गाव, काशी दर्शन बिल्डींगकडून (साईकृपा अॅटो गॅरेज) उजव्या बाजूने निलकंठ सृष्टी सोसायटीच्या डाव्या बाजूने मार्गस्थ होऊन रोनक सिटीमार्गे साई सत्यम बिल्डींग, मुथा कॉलेज वेदांत हॉस्पिटल मार्गे जातील.

प्रवेश बंद -

2) गांधारी चौक ते भट्टी चाय (सनसेट) संपूर्ण रस्ता 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

ही वाहने भट्टी चाय (सनसेट) थारवानी बिल्डींगकडून उजवे बाजूने झुलेलाल चौक येथून डावे वळण घेवून गोदरेज हिल बारावे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद -

3) रूतू बिल्डींगकडे जाणाऱ्या रस्त्यावर 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. तर इथून पर्यायी मार्ग ही वाहने रूतू बिल्डींगकडून वेदांत हॉस्पिटल मुथा कॉलेज पाण्याच्या टाकीपासून पुढे जाऊ शकतात.

Kalyan Lok Sabha Election 2024
Ravindra Dhangekar News : आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

प्रवेश बंद

4) डी मार्टकडून अग्रवाल कॉलेज मातोश्री हॉस्पिटलकडे येणाऱ्या वाहनांना 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहेत. तर इथून ही वाहने डी मार्ट ते वसंत व्हॅली वायलेनगर मार्गाने पर्याय मार्ग असेल.

प्रवेश बंद

5) महाराजा अग्रसेन चौकाकडून हिना गार्डन, तुलसीपुजा चौक, कस्तुरी पार्क, गणपती चौक कडे जाणाऱ्या वाहनांना 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. तर ही वाहने महाराजा अग्रसेन चौककडून डावीकडे वळून वायलेनगर येथून खडकपाडा ते दुर्गाडी अशा मुख्य वाहिनीस इथून पर्यायी मार्गाने जातील.

प्रवेश बंद

6) डी. बी चौक ते गणपती चौक, निक्कीनगर मार्ग 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. ही वाहने डी.बी चौक ते ओम रेसीडन्सी समोरून डावे बाजूस वळून निलकंठ सृष्टी सोसायटीच्या उजवे बाजूने काशी दर्शन बिल्डींगसमोरून डावे बाजूकडे वाडेघर गाव वाडेघर सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

Kalyan Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘या’ चौघांची केली प्रस्तावक म्हणून निवड; उमेदवारी अर्ज दाखल

प्रवेश बंद -

7) आधारवाडी सिग्नल चौक ते आधारवाडी जेल, डी. बी चौक येथे वाहनांस 'प्रवेश बंद' असणार आहे. ही वाहने वाडेघर सर्कल हनुमान मंदीर, वाडेघर, काशी दर्शन बिल्डींग, समर्थ कृपा अॅटो गॅरेजकडून उजवे बाजूस निलकंठ सृष्टीच्या डावे बाजूने वळण घेवून ओम रेसीडन्सी समोरून पर्यायी मार्गाने जाणार आहेत.

प्रवेश बंद -

8) वायलेनगर पोलिस चौकीकडून आधारवाडी जेल रोड कडे जाणाऱ्या वाहनांना 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. ही वाहने वायलेनगर पोलिस चौकी ते वायलेनगर चौक येथून मेन दुर्गाडी ते खडकपाडा मुख्य वाहिनी मार्गे इच्छित स्थळी पर्यायी मार्गाने जातील.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com