Pune Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांनी बनवली गुन्हेगारांची 'कुंडली'

Pune Police Lok Sabha Election News : पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे ग्रामीणमध्ये तब्बल साडेसोळा ते सतरा हजार पोलिस कर्मचारी निवडणुकीच्या काळात तैनात करण्यात येणार आहेत.
maharashtra police lok sabha election
maharashtra police lok sabha electionsarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीचा ( Lok Sabha Election 2024 ) कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभेचे मतदान होणार असून, यासाठीची आचारसंहिता आता सुरू झाली आहे. निवडणूक अधिकाधिक पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने पावले उचलली आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांसह पुणे ग्रामीण परिसरातील 10 हजार गुन्हेगारांची 'कुंडली' पोलिसांनी तयार केली आहे. या तीनही विभागातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासदेखील सुरुवात करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुवस्थेला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे ग्रामीणमधील तब्बल साडेसोळा ते सतरा हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासाठीचे आदेश पोलिस कर्मचारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. या काळात कामामध्ये हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. या वेळी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह पोलिस दलातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "पुणे शहरात तीन हजार 227 मतदान केंद्रे आहेत. यातील 430 मतदान केंद्रे बारामती मतदारसंघामध्ये येतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सात हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. आचारसंहितेचे कडक पालन केले जाणार असून, यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत. अमली पदार्थ पुरवठा, बेहिशेबी अथवा मोठ्या रकमेची वाहतूक, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक विशेष लक्ष ठेवले जाणार आहे."

maharashtra police lok sabha election
Lok Sabha Election 2024 : नगर पोलिस अ‍ॅक्शन मोडवर, 17 हजारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विनय कुमार चौबे यांनी म्हटलं, "मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघांत एक हजार 854 मतदान केंद्रे आहेत. पोलिसांकडून गेल्या चार महिन्यांत अडीच हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 13 जणांवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायदा, तर 18 जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे."

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, "पुणे ग्रामीणच्या हद्दीत बारामती, शिरूर, मावळ या मतदारसंघांचा समावेश होतो. येथे तीन हजार 102 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी पाच मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. तेथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार केला आहे. सहा हजार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची तपासणी केली जात असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे."

R

maharashtra police lok sabha election
Mumbai Prison Department 2024: मुंबई कारागृहासाठी पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com