Lok Sabha Election 2024 : ठाण्यातील निवडणुकीत नारीशक्ती पेलतेय शिवधनुष्य

Election Commission : निवडणूक आयोगाकडून अनेक मतदारसंघांमध्ये महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. सर्व कामकाज महिलाच पार पाडताना दिसत आहेत.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Thane Constituency : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) अनेक मतदान केंद्रांवर महिला व युवक अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी जबाबदारी सोपवली. अनेक मतदान केंद्रांमध्ये महिला आदर्श निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करत निवडणुका पार पाडण्याचे काम समर्थपणे सांभाळत आहेत. ठाणे जिल्ह्यातही नारीशक्ती निवडणुकीचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलताना दिसत आहे.

ठाणे (Thane) जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात निवडणूक होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या दोन मतदारसंघात 20 मेला मतदान (Voting) होणार आहे. तिन्ही मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी महिला अधिकारी काम पाहत आहेत. ठाणे जिल्हा निवडणूक (Election) अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अर्चना कदम काम करत आहेत. (Latest Political News)

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : चार टप्प्यांत 45 कोटींहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; महाराष्ट्र मागेच

कल्याण मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी पदाची धुरा उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे तर ठाणे  मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये धुळे काम पाहत आहेत. ठाण्यातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  उपजिल्हाधिकारी शीतल देशमुख, उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील आणि उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे या कामकाज पाहत आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात उपजिल्हाधिकारी वैशाली परदेशी, वैशाली लंभाते आणि अंजली पवार यांच्याकडे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भिवंडी लोकसभा मतदारसंघात तहसीलदार कोमल ठाकूर, कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रशांती माने, कल्याणी मोहिते, स्वाती घोंगडे, ठाणे लोकसभा मतदारसंघात आसावरी संसारे यांच्याकडे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जिल्हा निवडणूक कार्यालयात तहसीलदार उज्ज्वला भगत, नायब तहसीलदार स्मितल यादव, निलिमा मेंगळ, हेमलता भोये यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या उप माहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे याही प्रसिद्धीचे कामकाज सांभाळत आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे काम या जिल्ह्यातील नारीशक्ती करीत आहे.

उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेण्यापासून ते त्यांची अंतिम यादी  तयार करणे, मतदान केंद्रे ‍निश्चित करुन त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, मतदान  केंद्रावर  निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीन्स, बॅलेट ‍ युनिट, कंट्रोल युनिट आदींची उपलब्धतता करुन देणे, तसेच राखीव मशीन्स ठेवणे आदी सर्व कामांचा आढावा, मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदारांना मदतीसाठी सर्वप्रकारची तयारी महिला अधिकारी व कर्मचारी सक्षमपणे करत आहेत.

Lok Sabha Election 2024
Election Commission News : आचारसंहिता भंगाच्या तब्बल 425 गंभीर तक्रारी; काँग्रेसकडून भाजपपेक्षा दुप्पट...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com