New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी चार टप्प्यांतील मतदान प्रक्रिया सोमवारी पुर्ण झाली. आता राजकीय पक्षांतील पुढील तीन टप्प्यांतील मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा पाऊस मागील दोन महिन्यांत पडल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) या प्रचारावर बारकाईने लक्ष दिले जात आहे. राजकीय पक्षांकडून तब्बल 425 गंभीर तक्रारी आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेसने केलेल्या तक्रारींची संख्या भाजपच्या तुलनेत दुप्पट आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) घोषणा केली अन् देशात आचारसंहित लागू झाली. ता. 16 मार्चपासून देशात निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार राजकीय पक्षांचा प्रचार सुरू झाला. या काळात आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारी, त्याचे निरसन याबाबतची माहिती आयोगाने प्रसिध्द केली आहे. (Latest Political News)
चार टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. कोणत्याशी अडथळ्यांशिवाय ही प्रक्रिया पार पडल्याचे सांगत आयोगाने म्हटले आहे की, मागील दोन महिन्यांत विविध राजकीय पक्षांची 25 शिष्टमंडळं आयोगाकडे आली होती. (Model Code of Conduct) त्यामध्ये 16 शिष्टमंडळं राजकीय पक्षांची होती. त्याचप्रमाणे जिल्हा आणि राज्य स्तरावरही अनेकांनी भेट दिली. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजकीय पक्षांकडून या काळात आचारसंहिता भंगाच्या जवळपास 425 तक्रारी करण्यात आल्या. त्यामध्ये सर्वाधिक 170 तक्रारी काँग्रेसकडून (Congress) तर 95 तक्रारी भाजपकडून (BJP) करण्यात आल्या. जवळपास 160 तक्रारी इतर पक्षांकडून करण्यात आल्या होत्या. एकूण तक्रांरीपैकी जवळपास 400 तक्रारींची सोडवणूक करण्यात आली असून आवश्यक कारवाई करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. उर्वरित तक्रारींवरही कार्यवाही सुरू असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
आयोगाने नागरिकांनाही तक्रारींसाठी सी-व्हिजिल ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे आतापर्यंत तब्बल 4 लाख 22 हजार 432 तक्रारी आल्या आहेत. जवळपास 88 टक्के तक्रारींचा निपटारा झाला असल्याची माहिती आयोगाने दिली. एका तक्रारीसाठी सरासरी 100 मिनिटांचा कालावधी लागल्याचेही आयोगाने म्हटले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अनधिकृत होर्डिंग्ज, मालमत्तेचे विद्रुपीकरण, निश्चित वेळेनंतरही प्रचार करणे, वाहनांची अधिकच संख्या आदी तक्रारींचा समावेश होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.