Mahajanko : आयटीआय-डिप्लोमा उत्तीर्णांसाठी 'महाजनको'मध्ये नोकरीची संधी; वाचा सविस्तर

Maharashtra News : नोकरीचे ठिकाण चंद्रपूर
Mahajanko
MahajankoSarkarnama
Published on
Updated on

आयटीआय आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जानिर्मिती विभागात नोकरी करण्याची संधी आहे. ऊर्जा विभागाच्या महाजनको या विभागामार्फत शिकाऊ कामगार म्हणून ही भरती करण्यात येत आहे. नोकरीचे ठिकाण चंद्रपूर आहे. या नोकरभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

एकूण जागा..

ऊर्जानिर्मिती विभागाच्या महाजनकोमार्फत आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये आयटीआयचे फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वायरमन, MMV, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, COPA, ICTSM, मेसन, मशिनिस्ट ग्राइंडर, डिझेल इत्यादी ट्रेड उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, स्टेनोग्राफर या पदाच्या एकूण 210 जागा भरण्यात येणार आहेत, तर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक यांच्या 36 जागा अशा एकूण 246 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवाराचे वय...

महाजनकोच्या या भरतीसाठी उमेदवारांना महाजनकोच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 जानेवारी 2024 इतकी आहे. या भरतीसाठी उमेदवार हा संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असावा, तसेच पदवीधर अप्रेंटिसपदासाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केलेली असावी, तर डिप्लोमा अप्रेंटिससाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 25 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षेदरम्यान असावे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया..

या भरतीसाठी 2021 नंतर आयटीआय डिप्लोमा झालेल्या उमेदवारांचेच अर्ज भरतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहेत. भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंगमधील गुणवत्तेनुसार केली जाणार आहे.

सविस्तर माहिती

यासाठी उमेदवाराने WWW.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर 25 जानेवारीपूर्वी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसह ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. या भरतीबाबत सविस्तर माहितीसाठी जाहिरातीच्या पुढील लिंकवर भेट द्यावी. https://drive.google.com/file/d/1egV3ikUP6hVM_1N4rMYFd7bPHoCjdUIK/view

Edited by: Mangesh Mahale

R...

Mahajanko
Shiv Sangram News: 'शिवसंग्राम' महायुतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com