IAS Transfer Order: मोठी बातमी! राज्यातील तीन बड्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली; कुणाची कुठे झाली बदली ?

Maharashtra IAS Officer Transfer List: तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे परिपत्रक सरकारकडून जारी
IAS Transfer Order
IAS Transfer OrderSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्य सरकारने राज्यातील विविध विभागात कार्यरत असलेल्या तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी दिले आहेत, तर सोमवारी 13 नोव्हेंबरला पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. यानंतर आज तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे परिपत्रक सरकारकडून जारी करण्यात आले आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या या परिपत्रकात तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचा समावेश आहे. यामध्ये डॉ. भाऊसाहेब दांगडे, श्रीधर दुबे पाटील, डॉ. इंदुरानी जाखर यांच्या नावाचा समावेश आहे. कोणत्या अधिकाऱ्याची आता कोणत्या विभागात बदली करण्यात आली, याबाबत सविस्तर माहिती पाहूयात...

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

IAS Transfer Order
IAS Transfer Order: मोठी बातमी! राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?

कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली?

- डॉ. भाऊसाहेब दांगडे, IAS (2011) महापालिका आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्रीधर दुबे पाटील, IAS (2014) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, रायगड यांची व्यवस्थापकीय संचालक, महा.राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन, मुंबई, या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

- डॉ. इंदुरानी जाखर, IAS (2016) व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई यांची कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सोमवारी कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या ?

- सहसचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे (मंत्रालय) सहसचिव IAS प्रवीण पुरी (2011) यांची अपंग व्यक्तींसाठी आयुक्त, पुणे, येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे.

- उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव IAS (1997) आशीष शर्मा यांची राज्य कर (GST) मुंबई येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

- महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक IAS अमन मित्तल यांची पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या (मंत्रालय) उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

- नगर जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष IAS विकास पानसरे यांची कोकण विभागाचे (मुंबई) अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक IAS (2013) दीपक तावरे यांची कर्मचारी राज्य विमा योजनाचे आयुक्त (मुंबई) म्हणून करण्यात आलेली आहे.

Edited by Ganesh Thombare

IAS Transfer Order
Chandrapur Politics : काँग्रेसनं केलं आंदोलनाचं नियोजन, बीआरएसनं आधीच मारली बाजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com