Cabinet Meeting
Cabinet MeetingSarkarnama

IAS transfers : बदल्यांचा धडाका कायम! 'MMRDA' चा कारभार आस्तिक पांडेंकडे तर सत्यम गांधी सांगली-मिरजचे आयुक्त

IAS transfers Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात (ता.08 एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळाच्या राज्य सरकारने राज्यातील पाच बड्या 'आयएएस' अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला होता. अशातच आता राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
Published on

Mumbai News, 16 Apr : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात (ता.08 एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळाच्या राज्य सरकारने राज्यातील पाच बड्या 'आयएएस' अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला होता.

अशातच आता राज्य सरकारने 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार आता 'एमएमआरडीए'च्या सहआयुक्तपदी आस्तिक कुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते कर्मचारी राज्य विमा योजनेचे आयुक्त होते.

Cabinet Meeting
Gram Panchayat Scam : ग्रामपंचायतीच्या बिलात दहा लाखांचा घोटाळा; महिला सरपंचासह संपूर्ण बॉडी बरखास्त होण्याची शक्यता

एमएमआरडीए सहआयुक्तपदी अस्तीक पांडे यांची बदली करण्यात आली आहे. तर राज्य कर्मचारी विमा योजनाच्या आयुक्तपदाची आर.एस.चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Cabinet Meeting
Eknath Shinde : "घरात बसून कुणालाही..."; राज ठाकरेंची भेट घेताच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं अन् भेटीचं कारणही सांगितलं

राहुल गुप्ता यांची हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली आहे. याआधी त्यांच्याकडे महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी होती. सत्यम गांधींकडे आता सांगली मिरज कुपवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसंच डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारीपदाची जबाबदारी विशाल खत्रींकडे देण्यात आली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com