

Teacher Recruitment Maharashtra : महाराष्ट्रासह देशभरातील शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांनाही ही परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. त्याविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. अनेक खासदारांनी संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला होता.
महाराष्ट्र सरकारने आदिवासी आश्रमशाळांबाबतही आपले धोरण स्पष्ट केले आहे. सरकारने सुप्रीम कोर्टाच्या अंजुमन ईशात ए तालिम ट्रस्ट विरूध्द महाराष्ट्र शासन या याचिकेवर १ सप्टेंबरला दिलेल्या निकालाचा संदर्भ दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार, राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वयंसेवी संस्थांद्वारे संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी ५ वर्षांपेक्षा जास्त कालावाधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत, त्यांना सेवेत राहण्यासाठी दोन वर्षांच्या आत म्हणजे १ सप्टेंबर २०२७ पूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येणार आहेत. तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीवेळी टीईटी उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
टीईटी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास संबंधित पदावर कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे, असा पर्याय सरकारने सुचविला आहे. नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नाहीत. त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्रसमाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरुपात भरण्यात यावे, असेही सरकारने म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.