Police Promotion News : पोलिस दलात पुन्हा खांदेपालट; दहा तरुण आयपीएसना प्रमोशनवर फिल्ड पोस्टिंग!

Maharashtra Police Promotion News : आक्रितच घडले, दोन पीआयने चक्क प्रमोशन नाकारले..
Maharashtra Police Promotion News
Maharashtra Police Promotion NewsSarkarnama

Pimpri Chinchwad News : आयपीएस वगळता राज्य पोलिस दलात प्रमोशनसाठी खूप वाट पाहावी लागते. त्यानंतर प्रमोशन मिळताच कुठेही जायला सबंधित पोलिस कर्मचारी वा अधिकारी तयार असतो.

मात्र, प्रमोशन मिळालेल्या दोन पीआय पदावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे चालून आलेला प्रमोशन प्रस्ताव चक्क नाकारल्याची दुर्मीळ घटना घडली. त्यामुळे त्याची पोलिस खात्यात वेगळीच चर्चा आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Police Promotion News
IAS Transfer Order: मोठी बातमी! राज्यातील तीन बड्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली; कुणाची कुठे झाली बदली ?

दरम्यान, राज्य पोलिस दलात सोमवारी (ता. 20) पुन्हा खांदेपालट करण्यात आला. दहा नव्या दमाच्या तरुण आयपीएसना नियुक्तीनंतर चार वर्षांतच प्रमोशनवर फिल्ड पोस्टिंग देण्यात आली. इतर 18 आयपीएस (भारतीय पोलिस सेवा ) आणि रापोसे (राज्य पोलिस सेवा) अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्याच्या गृह विभागाने केल्या, तर यापूर्वी बदल्या झालेल्या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बदल केला.

पीआय तथा पोलिस निरीक्षक संजय रामचंद्र शिंदे आणि सचिन सुधाकर सांडभोर यांना गेल्या महिन्यात डीवायएसपी, नवी मुंबई आणि एसीपी, मुंबई असे प्रमोशन राज्य सरकारने दिले होते. मात्र, त्यांनी ते लगेच नको असल्याचे सांगितले.

तसा विनंती अर्ज डीजीपी म्हणजे राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिला. त्यानुसार आज गृह विभागाने आदेश काढून त्यांचे प्रमोशन रद्द केले. काही क्रीम पोस्टिंग असल्याने प्रमोशन मिळूनही काही अधिकारी ते घेत नाहीत, तर काही प्रमोशन ही साइड ब्रँचला झालेली असल्याने तेथे जायला अधिकारी नाखूष असतात, त्यातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maharashtra Police Promotion News
Lalit Patil Case Update : सचिन वाघला घेऊन पोलिसांची पुन्हा गिरणा नदी किनारी ड्रग्ज शोध मोहीम!

2017, 2018 आणि 2019 च्या आयपीएस बॅचमधील दहा तरुण अधिकाऱ्यांना प्रमोशनवर फिल्ड पोस्टिंग आज देण्यात आली. त्यातील नऊ जणांना अॅडिशनल एसपी, तर एकाला डीसीपी म्हणून नेमण्यात आले आहे. बाकीच्या बदली झालेल्या 18 जणांत पुणे पोलिस दलातील डीसीपी श्रीनिवास घाडगे यांचा समावेश आहे.

त्यांची बदली डीसीपी, पीसीआर (नागरी हक्क संरक्षण), नागपूर येथे झाली आहे, तर नाशिक ग्रामीणच्या अॅडिशनल एसपी माधुरी केदार (कांगणे) या त्याच पदावर पुणे रेल्वेत आल्या आहेत. तेथील गणेश शिंदे यांची अमरावतीत डीसीपी म्हणून बदली करण्यात आली आहे. पुणे रेल्वे एसपी श्रीकांत धिवरे यांची एसपी धुळे म्हणून नेमणूक झाली आहे.

वर्षभरापूर्वी म्हणजे गेल्यावर्षी सात नोव्हेंबरला संभाजी कदम यांची अमरावतीला डीसीपी म्हणून बदली झाली होती. त्यात आज बदल करण्यात येऊन त्यांना त्याच पदावर पुणे शहर पोलिस दलात आणण्यात आले आहे, तर गेल्यावर्षीच 27 नोव्हेंबर रोजी एसपी, पीसीआर, नाशिक येथे बदली झालेले विक्रम साळी यांना आता अमरावती ग्रामीणचे अॅडिशनल एसपी करण्यात आले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com