Sugarcane FRP Issue : स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षाला पोलिसांनी घरातून उचललं; आंदोलनाचा भडका उडणार?

Swabhimani Shetkari Sanghtana : "साखर कारखानदारांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले..."
Kolhapur News :
Kolhapur News :Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Latest News : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे सोमवारी रात्री ट्रॅक्टर पेटवल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह चौघांना पेठ वडगाव पोलिसांनी राहत्या घरातून पारगाव (ता. हातकणंगले) येथून ताब्यात घेतले आहे. वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यास ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला अज्ञातांनी पेटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बुधवारी (ता.१५) सकाळी पेठवडगाव पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह चार जणांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

Kolhapur News :
Nagpur BJP Leader Murder : मजुरीच्या १२ हजार रुपयांवरून झाली भाजप पदाधिकाऱ्याची हत्या

वैभव कांबळे यांच्या अटकेनंतर स्वाभिमानीच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. स्वाभिमानी आक्रमक झाली होती. यामुळे काही वेळ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. कांबळेंसह अटक केलेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. यामुळे तूर्त तरी त्यांना कोठडीतच राहावे लागणार आहे.

Kolhapur News :
Wai NCP News : नितीन पाटलांनी केले मकरंद आबांचे कौतुक; म्हणून ते तीन टर्म आमदार झाले...

यावर प्रतिक्रिया देताना कांबळे म्हणाले, "आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून साखर कारखानदार व सरकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मोडीत काढून स्वाभिमानीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु खोटे गुन्हे दाखल करून आमचा आवाज पोलिस दाबू शकत नाहीत. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com