Third Mumbai : नवी मुंबई विमानतळाजवळ वसणार 'तिसरी मुंबई'; राज्य सरकारने दिली मंजुरी

Maharashtra Government Developing A New City Called The Third Mumbai : महाराष्ट्र सरकारने 'तिसरी मुंबई'ला दिली मंजुरी...
Third Mumbai News
Third Mumbai NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Development News : आगामी काळात मुंबई विमानतळावरील मोठ्या प्रमाणावरील वाहतूक ही नवी मुंबई विमानतळावर वळवली जाणार आहे. त्या दृष्टीने नवी मुंबई विमानतळाचा विकास होत आहे. आता नवी मुंबई विमानतळालगत 'तिसरी मुंबई' नावाचे नवीन शहर उभारले जाणार आहे. या नवीन शहराला राज्य सरकारने मंजुरी दिली. तिसरी मुंबई ही मुंबई ट्रान्स हार्बर लिंकशी जोडण्यात येईल.

Third Mumbai News
CP Retesh kumar : पोलिस आयुक्तांचं मोक्काचं शतक, पण गुन्हेगारी कंट्रोलमध्ये येईना!

काय आहे राज्य सरकारचा प्लॅन?

मुंबईपासूनजवळ असलेल्या नवी मुंबईचा विकास सिडकोच्या माध्यमातून झाला. आता याच सिडकोच्या माध्यमातून तिसरी मुंबईचा विकास होणार आहे. तिसरी मुंबई म्हणून विकसित होत असलेल्या उरण, पनवेल तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 12 हजार कोटी रुपये खर्च करून रस्ते बांधणार आहे. नैना क्षेत्र असलेल्या 23 गावांच्या विकासासाठी सिडकोने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या निर्णयाला मंजुरी दिली असून त्याचे टेंडरही काढण्यात येणार आहे. हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ना चौक, ना सिग्नल... असे असतील रस्ते

सिडकोद्वारे बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर ना चौक असतील ना सिग्नल. अतिशय आधुनिक पद्धतीने हे रस्ते बांधले जातील. यामुळे सरळ रस्ते असतील. आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा अंडरपास बांधले जातील. यासाठी सिडकोकडून 12 नोडची विकासकामे एकाच टप्प्यात केली जातील. भूसंपादन प्रक्रियेतही सुधारणा केली जाणार आहे.

नैना प्रकल्पाला विरोध

पनवेल, पेण, उरणमधील नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यापूर्वी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती.

Third Mumbai News
Eknath Shinde News : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दोन प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठी घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com