
Pandharpur, 01 April : उत्तमराव जानकर चार वेळा निवडणुकीत हरले, तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळा झाला नाही. पण, पाचव्यांदा निवडून आल्यावर मात्र ईव्हीएममध्ये घोटाळा झाला, असे म्हणाले. हरले तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं. जिंकल्यावर म्हणाले, ईव्हीएम चुकली. त्यांना आमचा विरोधक (आमदार रोहित पवार) जोडीदार निघाला, अशा शब्दांत ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठविणारे आमदार उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांंनी टोला लगावला.
पंंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते.
ते म्हणाले, माजी सभापती वामनराव माने यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यक्रमाला आल्याबद्दल मला विशेष आनंद झाला. पण, काही तुमच्या गोष्टी अधुऱ्या राहिल्या आहेत. शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण, ती आपल्याला जिंकता आलेली नाही. भविष्यकाळात प्रयत्न करायला हरकत नाही, प्रशांतमालक (Prashant Paricharak) आहेत, आपल्याबरोबर. गरज पडली तर आम्ही सहकार्य करू. आता काय कोणाचं काही सांगता येत नाही. कोण कोणाच्या पक्षात आहे आणि कोण कोणाच्या मागं आहे, हे कळतच नाही. अशी सध्याची राजकीय परिस्थिती झालेली आहे.
आमदार उत्तमराव जानकर कार्यक्रमाला थांबले असते तर बरं झालं असतं. काही बोलता आलं असतं. मीही राखून ठेवलं होतं. पण, त्यांच्या पश्चात आणि अनुपस्थितीत बोलणं योग्य की अयोग्य आहे, हे मला माहिती नाही. उत्तमराव जानकर चार वेळा निवडणुकीत हरले, तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळा झाला नाही. पण पाचव्यांदा निवडून आल्यावर मात्र ईव्हीएममध्ये घोटाळा झाला, असे म्हटले, असे राम शिंदे यांनी नमूद केले.
हरले तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं. जिंकल्यावर जानकर म्हणाले, ईव्हीएम चुकली. त्यांना आमचा विरोधक (आमदार रोहित पवार) जोडीदार निघाला. आम्हाला ६२२ मतांनी हरवले, तेही म्हणाले, ईव्हीएम चुकली. मला वाटलं ‘बरं झालं, या दोघांनी ईव्हीएम चुकली म्हणून राजीनामा दिला, तर पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याचा चान्स येईल. पण त्यांनी तसं काही केलं नाही, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, कोण कोणासोबत आहे, हे आता कळतच नाही. अण्णा, आता तुमच्यासारखी निष्ठावंत माणसं आता कुठं राहिली आहेत. पण, जिथं निष्ठा असते, तिथंच फळ असतं. पण, सध्या वेगळं चाललं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.