Mahayuti Government : शिंदे- फडणवीस- पवार सरकारचं निवडणुकीआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात 'एवढ्या' टक्क्यांची वाढ

State Government Big Announcement : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या वादळी ठरत आहे. या अधि्वेशन काळात रोज नवनव्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Maharashtra Government
Maharashtra GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी केलेली महायुती आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागली आहे. पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या महायुती सरकारच्या अर्थसंकल्पातही पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.तसेच 94 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या चर्चा न करता मंजूर केल्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला होता.

विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याची मानसिकता सध्या केंद्रातील मोदी- शाह आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारची नाही. त्यामुळे गाफील न राहता विरोधकांवर काऊंटर अॅटक करण्याची स्ट्रॅटजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आखली आहे.

आता शिंदे फडणवीस- पवार सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठे गिफ्ट दिले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 46 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढ 1 जानेवारी 2024पासून पूर्वलक्षी प्रभावाने वाढ लागू करण्यात येणार आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खूष करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या निर्णयातून दिसून येत आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या वादळी ठरत आहे. या अधि्वेशन काळात रोज नवनव्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.

Maharashtra Government
Radhakrishna Vikhe patil : "आरक्षणाचे खरे शत्रू कोण? मराठा समाजाने ओळखावे"; मंत्री विखेंचा निशाणा कोणावर?

जयंत पाटील यांनी 94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या एका शब्दाचीही चर्चा न करता मंजूर करण्यासाठी सभागृहात सत्तारूढ पक्षाने गोंधळ घातला आणि सभागृह तहकूब केल्याचा दावा केला आहे. महायुती सरकारकडून महाराष्ट्राच्या माथ्यावर 94 हजार कोटींचा नवा भुर्दंड मारण्यात आल्याचेही ते म्हणाले. या पुरवणी मागण्यांना विरोधीपक्ष नाकारतील याची खात्री असल्याने हा पळपुटेपणा महाराष्ट्र सरकारने केला आहे असेही त्यांनी सांगितले आहे.

राज्याचे वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 94 कोटी 889 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात येत आहेत. या पुरवण्या मागण्यात महिला आणि बाल विकास खात्याला सर्वाधिक 26 हजार 273 कोटींची, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नमो शेतकरी योजनेसाठी 5 हजार कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.

Maharashtra Government
Nagpur Collector and Voting Percent : लोकसभेवेळी मतदानाचा टक्का घसरल्याने विधानसभेसाठी नागपूरचे जिल्हाधिकारी 'मिशन मोड'वर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com