Latest News Maharashtra Officer's : IASच्या बदल्या रखडल्या; शिंदे, फडणवीस, पवारांच्या कात्रीत अडकले अधिकारी

Mahayuti Sarkar : शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये एकमत होत नसल्याचे 'आयएएस'च्या बदल्यांचा घोळ वाढल्याचे बोलले जात आहे. काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर 'अर्थ'पूर्ण निर्णय होऊनही त्यांनाही ताटकळत ठेवण्यात आले आहे.
Devendra Fadnavis, eknath Shinde
Devendra Fadnavis, eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्घाटने, भूमिपूजन आणि आता जागावाटपाच्या फेऱ्यात अडकलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , अजित पवारांमुळे (Ajit Pawar) काही 'आयएएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत.

दुसरीकडे, कोणत्या अधिकाऱ्याला कुठे नेमायचे ? यावर शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये एकमत होत नसल्याचे 'आयएएस'च्या बदल्यांचा घोळ वाढल्याचेही बोलले जात आहे. काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर 'अर्थ'पूर्ण निर्णय होऊनही त्यांनाही ताटकळत ठेवण्यात आले आहे.

बदल्यांमधील घोळ वाढल्याने प्रशासनात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. मनासारखी बदली करून (सोयीचे शहर, 'लाभा'चे पद) देण्याचा शब्द सरकारमधील बड्या नेत्यांनी काही अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. मात्र, गेल्या काही दिवसांत 'ऑर्डर' (बदल्यांचा आदेश) काढले जात नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. पुढच्या दोन-चार दिवसांत कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने अधिकारी बदलीच्या 'ऑर्डर'कडे डोळे लावून बसले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील प्रशासकीय व्यवस्थेतील काही वरिष्ठ 'आयएसएस' अधिकाऱ्यांची मुदत संपली आहेत. त्यात महापालिका आयुक्तांपासून अतिरिक्त आयुक्त, जिल्हाधिकारी, महामंडळांमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या Loksabha Election 2024 तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काही अधिकाऱ्यांनी बड्या नेत्यांच्या मर्जी सांभाळून बदलीसाठी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यानुसार सरकारमधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांत बदल्यांवर चर्चा झाली.

Devendra Fadnavis, eknath Shinde
Loksabha Election 2024 : उत्तर महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला, विद्यमानांना उमेदवारी मिळणार की होणार अपेक्षाभंग?

सरकारमध्ये तीन घटक पक्ष असल्याने त्या-त्या पक्षाच्या नेत्यांत एकमत होऊ शकले नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी 20 ते 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यावर सरकारमधील तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसून आल्याचेही सांगण्यात आले. त्यानुसार काही दिवसांत म्हणजे, मागील 15 दिवसांआधीच 'ऑर्डर' Officer Transfer निघणार असल्याचे.

अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे त्या-त्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत तशी धावपळही पाहायला मिळाली. परंतु, आता 15-20 दिवस झाले; तरीही बदल्यांचा पत्ता नसल्याने अधिकारी गोंधळले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या Loksabha Election 2024 अनुषंगाने सध्या राजकीय माहोल गरम आहे. 15 ते 17 मार्च या कालावधीत आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे आहेत. त्याआधी सत्ताधारी पक्षाने उद्घाटनाचा सपाटा लावला असून, दुसरीकडे घटक पक्षातील जागावाटपासाठीही बैठकांचा सिलसिला सुरू आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या फारच 'बिझी' आहेत. त्यामुळेच 'आयएएस'च्या IAS Transfer बदल्यांसाठी वेळ नसल्याचे बोलले जात आहे. त्यावरून बदल्या होणार की नाहीत, या स्थितीत अधिकारी धास्तावले आहेत.

Edited By : Rashmi Mane

R

Devendra Fadnavis, eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये भडका; हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवर भाजपची फुली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com