
पुणे, नागपूर, नवी मुंबई आणि ठाणे मेट्रो प्रकल्पांवर काम करणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. विविध अभियंता आणि व्यवस्थापन पदांसाठी एकूण 151 जागांची भरती जाहीर करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरतीमध्ये Chief Project Manager (Telecom), Chief Project Manager (Electrical), Chief Project Manager (E&M), Chief Project Manager (PSI)-E7 यांसारख्या वरिष्ठ पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 जुलै 2025 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी उमेदवारांकडे B.Arch, BE, B.Tech, CA किंवा ICWA सारख्या पदव्या असणे गरजेचे आहे. पदानुसार अनुभव आवश्यक आहे.
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून, त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40,000 ते 2,80,000 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.
उमेदवारांनी mahametro.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. यासोबतच आवश्यक कागदपत्रे पुणे, नागपूर, नवी मुंबई किंवा ठाणे येथील संबंधित मेट्रो प्रकल्प कार्यालयांमध्ये पाठवणे आवश्यक आहे. अर्जाची शेवटची तारीख 4 जुलै 2025 आहे.
सामान्य प्रवर्ग: ४००
राखीव प्रवर्ग: १००
🌐 अधिक माहिती व अर्जासाठी अधिकृत वेबसाइट: www.mahametro.org
ही संधी गमावू नका! पात्र उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा.