MPSC Result 2025 : 'एमपीएससी' निकालात सोलापूरचा डंका! विजय लमकणे राज्यात पहिला!

Vijay Lamkane MPSC Topper : या निकालात अनेक उमेदवारांनी आपले स्वप्न पूर्ण केले असून महाराष्ट्रभरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. विशेषतः सोलापूरच्या विजय लमकणे यांच्या राज्यात पहिल्या क्रमांकाच्या कामगिरीमुळे स्थानिकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
MPSC
MPSCSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला असून, सोलापूरच्या विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावत इतिहास घडवला आहे. त्यांच्या या यशामुळे सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री उशिरा आयोगाने हा निकाल प्रसिद्ध केला.

एमपीएससीतर्फे 27 ते 29 मे 2024 या कालावधीत राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती 30 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आल्या. मुलाखती संपल्यानंतर रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. एकूण 1,516 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते.

MPSC
New Rule : बँक नॉमिनीपासून क्रेडिट कार्डपर्यंत; 1 नोव्हेंबरपासून बदलणार हे 5 नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

या निकालात हिमालय घोरपडे यांनी दुसरा क्रमांक, तर नागपूरच्या प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, विजय लमकणे हे आधीच एमपीएससीच्या माध्यमातून विविध सेवांमध्ये निवड झालेले अधिकारी असून सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

महिलांची उल्लेखनीय कामगिरी

यंदाच्या राज्यसेवा परीक्षेत महिलांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुलींमधून आरती जाधव या राज्यात पहिल्या आल्या आहेत, तर अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून प्रगती जगताप यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. प्रगती जगताप सध्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

MPSC
KYV New Rule : वाहनधारकांसाठी ‘KYV’ ची सक्ती; नेमकं काय आहे हा नवा नियम?

या निकालात अनेक उमेदवारांनी आपले स्वप्न पूर्ण केले असून महाराष्ट्रभरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. विशेषतः सोलापूरच्या विजय लमकणे यांच्या राज्यात पहिल्या क्रमांकाच्या कामगिरीमुळे स्थानिकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशाने अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रेरणा मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com