Kashig Gram Panchayat : सरपंच-उपसरपंचांनी घोळ घातला, शिक्षा संपूर्ण ग्रामपंचायतीला; जागेवर बरखास्त केली

Mulshi Kashig Gram Panchayat dismissed : काशिग ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा कदम आणि उपसरपंच लक्ष्मीबाई सोपान तिडके यांना शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण करणं चांगलंच अंगलट आलं आहे. कारण शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी आता सरपंच आणि उपसरपंचासह संपूर्ण ग्रामपंचायतच बरखास्त करण्यात आली आहे.
Kashig Gram Panchayat
Pune divisional officials ordered the dismissal of Kashig Gram Panchayat after confirming illegal forest land encroachment by Sarpanch Varsha Kadam and her team.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 05 Oct : मुळशी तालुक्यातील काशिग ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा राहुल कदम आणि उपसरपंच लक्ष्मीबाई सोपान तिडके यांना शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण करणं चांगलंच अंगलट आलं आहे.

शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजात हलगर्जीपणा केल्याचं उघड झाल्यामुळे आता सरपंच आणि उपसरपंचासह संपूर्ण ग्रामपंचायतच बरखास्त करण्यात आली आहे.

त्यामुळे आता काशिग गावाचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे पुणे विभागीय आयुक्तांनी आदेश दिले आहेत. वन खात्याच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14(1) (ज) (3) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

Kashig Gram Panchayat
Shivsena : 'त्यांना कोणी असं बोलायला लावलं, असाही प्रकार...', रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

तर गावातील ग्रामसभा आणि मासिक सभा वेळेत न घेणं, कामात निष्काळजीपणा दाखवणं या कारणामुळे कलम 36 अंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी सरपंच वर्षा कदम यांना अपात्र ठरवलं. त्यानंतर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त करत गावचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी आणि आयुक्तांच्या निर्णयानंतर तक्रारदार नामदेव टेमघरे म्हणाले, 'ग्रामपंचायत बरखास्तीच्या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केलं आहे. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांद्वारे विकासकामे पारदर्शकपणे राबवली जातील आणि शासकीय मालमत्तेचे रक्षण होईल, अशी आम्हाला आशा आहे.'

Kashig Gram Panchayat
Ramdas Kadam Allegations Politics : बाळासाहेबांच्या मृत्यूचा विषय रामदास कदमांनी उगाच काढला नाही, मोठं राजकारण दडलंय!

दरम्यान, सरपंच वर्षा कदम यांनी बरखास्त केल्यानंतर गावगाड्यात ठरल्याप्रमाणे सदस्यांनी अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर राजीनामे दिल्यामुळे ग्रामपंचायत अल्पमतात आल्याचं सांगितंल. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात आम्ही विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com