Shivsena : 'त्यांना कोणी असं बोलायला लावलं, असाही प्रकार...', रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

Ramdas Kadam Controversy : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी दोन दिवस मातोश्रीवर कशासाठी ठेवला होता? अंतर्गत काय चाललं होतं? असे सवाल उपस्थित केले.
Bharat Gogawale, Ramdas Kadam
Shiv Sena leader Ramdas Kadam addressing the crowd at Eknath Shinde’s Dussehra rally, where his remarks on Balasaheb Thackeray’s death created a major political controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 05 Oct : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी दोन दिवस मातोश्रीवर कशासाठी ठेवला होता? अंतर्गत काय चाललं होतं? असे सवाल उपस्थित केले.

शिवाय यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आले. मात्र ते कशासाठी घेण्यात आले ते काही समजलं नाही, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने तर थेट रामदास कदम यांच्या पत्नीची आत्महत्या कशी झाली? याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तर दुसरीकडे शिंदेंचे काही नेते रामदास कदमांच्या वक्तव्याचं समर्थन करताना दिसत आहेत. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेचे कोकणातील नेते भरत गोगावले यांनी मात्र त्यांच्या विधानाचं समर्थन न करता आपणाला याबाबत काही माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

Bharat Gogawale, Ramdas Kadam
Amit Shah tour controversy : शिवसेना, मनसे अन् मराठ्यांची धरपकड; अमित शहांच्या दौऱ्यावर राऊतांनी डागली तोफ

'दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आले का? याची मला कल्पना नसल्याचं म्हणत कदमांच्या दाव्यावर त्यांची भूमिका नेमकी काय? याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवल्याच पाहायला मिळालं.

तर कोणाच्या मनात काय आहे? हे कोणीचं सांगू शकत नाही. त्यांना कोणी असं बोलायला लावलं, असा ही कोणता प्रकार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले, 'त्यावेळी रामदास कदम मातोश्रीवर होते, त्यांनी काही पाहिलं का? याचं ते उत्तर देत आहेत. त्यामुळे आम्ही यावर अधिकचं बोलणं उचित नाही.'

Bharat Gogawale, Ramdas Kadam
Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरे यांचे आघाडीचे संकेत महापालिका निवडणुकीत कोणाची अडचण वाढवणार?

दरम्यान, यावेळी त्यांनी रायगडच्या पालकमंत्री तिढा सोडवण्यात दिरंगाई होत असून पालकमंत्रिपदाची माळ माझ्या गळ्यात कधी पडते, याची मी ही वाट पाहतोय, असं म्हणत पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com