Mumbai Blast Case: मुंबईतील कारागृहात गँगस्टर अबू सालेमला धोका, नाशिकला हलवणार?

Gangster Abu Salem Shifted to Nashik Jail : तळोजा कारागृहाच्या अंडा सेलमध्ये अबू सालेम याला ठेवण्यात आले आहे. या अंडा सेलच्या भिंती कमकुवत झाल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे.
Abu Salem
Abu Salemsarkarnama
Published on
Updated on

Abu Salem News: कुख्यात गँगस्टर आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्याशी संबंधित अबू सालेम सध्या मुंबईच्या तळोजा कारागृहात आहे. या कारागृहात त्याला धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याला नाशिकच्या कारागृहात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्याभरात याबाबतचा निर्णय होईल. हा निर्णय झाल्यास नाशिकच्या कारागृहाची सुरक्षितता वाढवावी लागणार आहे.

तळोजा कारागृहाच्या अंडा सेलमध्ये अबू सालेम याला ठेवण्यात आले आहे. या अंडा सेलच्या भिंती कमकुवत झाल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या अंडा सेलची दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित आहे.

अबू सालेम Abu Salem कुख्यात दहशतवादी आहे. त्याच्यावर विविध खटले सुरू आहेत. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात त्याला शिक्षा झाली आहे. सालेमला १९ वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली होती. वादग्रस्त अभिनेत्री मोनिका बेदी हिच्यासह त्याला भारतात आणण्यात आले होते.

Abu Salem
Jayant Awad: भाजप नेते जयंत आव्हाड पुन्हा एकदा चर्चेत; महिलेला शिवीगाळ

आंतरराष्ट्रीय कराराचा भाग म्हणून त्याला भारतात हलविण्यात आले. प्रारंभी अबू सालेम याला अर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते.

अर्थर रोड कारागृहात अबू सालेमवर हल्ला झाल्याने तळोजा कारागृहात Jail हलविण्यात आले. आता तळोजा कारागृहातील अंडा असेल सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याच्या कारणामुळे त्याला नाशिक कारागृहात हलविण्यात येऊ शकते.

Abu Salem
Video Vikram Kale : विक्रम काळेंना अजित पवार गटाकडून मोठी संधी! नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com