Video Vikram Kale : विक्रम काळेंना अजित पवार गटाकडून मोठी संधी! नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून...

Pratod Post in Legislative Council Vikram Kale : विधान परिषदेमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतोद असणारे अनिकेत तटकरे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपला आहे.
Vikram Kale
Vikram KaleSarkarnama
Published on
Updated on

Vikram Kale News : विधान परिषदेमधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रतोद असणारे अनिकेत तटकरे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर विक्रम काळे यांना प्रतोद करण्यात यावे, असे पत्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून देण्यात आले आहे. या विषयीचे वृत्त 'साम' टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मात्र अद्याप यावर निर्णय घेतला नाही.

आमदार काळे Vikram Kale यांच्या आमदारकीची चौथी टर्म सुरू आहे. संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघावर त्यांनी सलग चार निवडणुकीतून पगडा निर्माण केला आहे. आपल्या कर्तृत्वातून त्यांनी या मतदारासंघावर वर्चस्व निर्माण केले आहे. धाराशिवची लोकसभा निवडणूक लढण्यास देखील ते इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर आमदार काळे हे अजित पवार गटासोबत राहिले होते.

Vikram Kale
Jayant Awad: भाजप नेते जयंत आव्हाड पुन्हा एकदा चर्चेत; महिलेला शिवीगाळ

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक होणार आहे. बलाबल पाहता महाविकास आघाडीचे MVA 3 तर, महायुतीचे 8 उमेदवार विजयी होवू शकतात. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाची मतं फूटणारी याची चर्चा सुरू आहे.

'या' सदस्यांचा कार्यकाळ संपतोय

विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपतो आहे. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये अनिल परब, रमेश पाटील,मनिषा कायंदे, विजय गिरकर, बाबाजानी दुराणी, नीलय नाईक, रामराव पाटील, डॉ. वजाहत मिर्जा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत पाटील (शेकाप) यांचा समावेश आहे.

Vikram Kale
Priyanka Gandhi On Om Birla : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर भडकल्या प्रियांका गांधी; नेमकं कारण काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com