Sanjay Raut On Amit Shah: अमित शाह गृहमंत्री आहेत, हे सांगायला लाज वाटते!

Sanjay Raut reply to Amit Shah BJP Adhiveshan: एका राज्यातून अमित शाह यांना तडीपार केले होते, असे सांगत राऊतांनी शाह यांच्याबाबत आपल्याला अधिक बोलायला लावू नका. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार बोलतील, असे सांगितले.
Sanjay Raut On Amit Shah
Sanjay Raut On Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील अधिवेशनात ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. शाह यांच्या टिकेला ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राऊतांनी शहांच्या विधानावर हल्लाबोल करीत 'अमित शाह (Amit Shah) हे देशाचे गृहमंत्री आहेत, हे सांगायला आम्हाला लाज वाटते,' अशी खंत व्यक्त केली.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घाणेरडं वक्तव्य करून ते निघून जातात. शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यामुळे केले ते अजित पवार, प्रफुल पटेल हे सगळे अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. शाह याच्यासमोरच देवेंद्र फडणवीस काय भाषा वापरत होते? ठोकून काढा, ही कुठली भाषा ? असा सवालही राऊतांनी केला.

"अमित शाह हे व्यापारी नेता आहेत. पण गुजरातच्या व्यापाऱ्याला आम्ही महाराष्ट्र लूटू देणार नाही. भाजपने पैसे देऊन आणि ईडीच्या धमक्या देऊनच आमदार फोडले. देशाचा गृहमंत्री कसा नसावा, याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांना एका राज्यातून तडीपार केले होते, असे सांगत राऊतांनी शाह यांच्याबाबत आपल्याला अधिक बोलायला लावू नका. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार बोलतील, असे सांगितले.

Sanjay Raut On Amit Shah
Sanjay Raut : 50 कोटी देऊन आघाडीच्या आमदारांना फोडणाऱ्या फडणवीसांना अटक करा! संजय राऊत संतापले

अमित शाह यांच्यासमोर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठोकून काढा असा आदेश दिला. "तुमच्यात दम असेल तर पदाचा राजीनामा द्या आणि ठोकायची भाषा करा," अशा शब्दात फडणवीसांना राऊतांनी खडेबोल सुनावले.

फडणवीस गुंडाची भाषा वापरत आहेत. रस्त्या-रस्त्यावर गुंडगिरी सुरू आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत आणि आपण म्हणताय ठोकून काढा,असे म्हणतात. पराभवाची भीती तुमच्या असल्याने ते अशी विधानं करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत फडणवीसांचा नागपुरातच पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. फडणवीस आणि अमित शाहांची अशी भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com