West Bengal Vidhan Sabha: प. बंगालच्या विधानसभेत तुफान राडा! BJP-TMC आमदारांमध्ये हाणामारी; भाजपच्या व्हिपला दाखवला घरचा रस्ता

West Bengal Vidhan Sabha: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं भाषण सुरु असतानाच हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांना भाषण करण्यात अडथळा आणणाऱ्या भाजपच्या चीफ व्हिपला विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलं.
BJP-TMC
BJP-TMC
Published on
Updated on

West Bengal Vidhan Sabha Rusk: पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजप आणि तृणमूलच्या आमदारांमध्ये तुफान राडा झाल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं भाषण सुरु असतानाच हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांना भाषण करण्यात अडथळा आणणाऱ्या भाजपच्या चीफ व्हिपला विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलं. त्यानंतरही या दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये जोरदार चकमक झाली विरोधकांनी घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं होतं.

BJP-TMC
BJP Vs OBC : भाजपनं डाव फिरवला, मराठ्यांसमोर ओबीसीचं उभं केलं नवं नेतृत्व? उपसमितीत बावनकुळेंकडे मोठी तर, भुजबळांकडे 'ही' जबाबदारी?

भाजपच्या चीफ व्हिपला दाखवला घरचा रस्ता

सुरुवातीला विधानसभेत गोंधळ घातल्यावरुन विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी भाजपचे चीफ व्हिप शंकर घोष यांना घोषणाबाजी आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अडथळे टाकल्याच्या कारणानं निलंबित करण्यात आलं. पण शंकर घोष यांनी सभागृहाबाहेर जाण्यास नकार दिला. शुभेंदू अधिकारी यांनी या घटनेचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर केला आहे.

BJP-TMC
Bachchu Kadu Maratha OBC reservation : ओबीसी-मराठ्यांची आग गावागावात.., महाराष्ट्र कसा वाचेल? बच्चू कडू कडाडले

भाजपचे आमदार आणि मार्शल्स भिडले

शंकर घोष यांनी निलंबनानंतर सभागृहाबाहेर पडण्यास नकार दिल्यानंतर अध्यक्षांनी मार्शल्स आणि सुरक्षारक्षकांना सभागृहाबाहेर नेण्याचे निर्देश दिले. दरम्यान, भाजप आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की सुरु झाली. त्यानंतर काही क्षणातच ही धक्काबुक्की हाणामारीत रुपांतरीत झाली. या हाणामारीत शंकर घोष यांचा चष्मा तुटला तसंच ते जखमी देखील झाले.

बंगालमध्ये हुकुमशाही सुरु

दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते सुभेंदू अधिकारी यांनी दावा केला की, मार्शल्सनं त्यांच्या आमदारांसोबत गैरव्यवहार केला. यामध्ये शंकर घोष हे गंभीर जखमी झाले आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी या घटनेचा निषेध करत म्हटलं की हा संसदीय लोकशाहीवर हल्ला आहे. आमच्या आमदारांसोबत मार्शलनं गैरवर्तन केलं आणि शंकर घोष यांना जखमी केलं. हा प्रकार तृणमूल काँग्रेसचा हुकूमशाहीचा पुरावा आहे. त्यांनी निलंबनाची कारवाई चुकीची असल्याचं सांगत अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. जेव्हा ते विधानसभेत पोहोचले तेव्हा ममता बॅनर्जी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत होत्या. यावरुन अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com