महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमारांच्या निलंबनाची ऊर्जामंत्र्यांनी केली घोषणा

भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कठोर संदेश डॉ. नितीन राऊत यांनी या आदेशाद्वारे दिला आहे.
Nitin Raut
Nitin RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी महावितरणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध बडगा उगारला आहे. भ्रष्टाचार आणि नैतिक अधःपतनाच्या गंभीर आरोप असलेल्या महावितरणचे सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक तथा मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार यांना तातडीने निलंबित करण्याचा आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज (ता. २४ मार्च) विधानसभेत दिला. भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कठोर संदेश राऊत यांनी या आदेशाद्वारे दिला आहे. (Energy Minister Nitin Raut announces suspension of MSEDCL Chief Investigating Officer Sumit Kumar)

सुमित कुमार यांना निलंबित करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश डॉ. राऊत यांनी विधानसभेत या विषयावरील उपस्थित लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिले. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ही लक्षवेधी मांडली होती. आमदार अमित झनक, बळवंत वानखेडे, प्रकाश सुर्वे, अशोक उईके यांनी या लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेऊन सुमित कुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या, अधिकाऱ्यांना धमकावण्याच्या व नैतिक अधःपतनाच्या गंभीर तक्रारी उर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

Nitin Raut
आमदार राजेंद्र राऊतांच्या मुलांचा जीव धोक्यात : फडणवीसांचा गंभीर आरोप

आपल्या पदाचा दुरुपयोग करत महावितरणमधील मीटर रिडींग एजन्सी तसेच अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केल्याची, विविध अधिकारी कर्मचारी यांना धमकावण्याचे काम सुमितकुमार यांनी केले आहे. त्याबाबतची रेकॉर्डेड क्लिप उपलब्ध असूनही तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक यांनी शिक्षा म्हणून त्यांची केवळ बदली केली. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक संगनमत करून मुख्य तपास अधिकारी हे पदही त्यांनी बळकावले आहे. तसेच, त्यांच्या विरोधात कल्याण परिमंडळ अंतर्गत नैतिक अधःपतनाच्या तक्रारी होण्याच्या मुद्द्यांवरही लक्षवेधी विधानसभेत मांडण्यात आली होती.

Nitin Raut
जानकरसाहेब, दुसरे एक मित्र जवळ आल्याने सध्या तुमच्याकडे दुर्लक्ष : अजितदादांनी घेतली फिरकी

सुमित कुमार यांच्याविरुद्धच्या आरोपांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या वतीने चौकशी करण्याची मागणी या आमदारांनी केल्यानंतर या मागणीला उत्तर देताना कुमार यांना तत्काळ निलंबित करीत असल्याची घोषणा डॉ. राऊत यांनी केली. ‘संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून सुमित कुमार यांच्याविरुद्धच्या आरोपांची चौकशी केली जाईल आणि या चौकशीत काही तथ्य आढळल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) पुढील चौकशी व कारवाई केली जाईल. अनेक महिला कर्मचाऱ्यांनी विशाखा समितीकडे त्यांच्याबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. सुमित कुमार यांच्या विरुद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

Nitin Raut
अजित पवारांनी सांगितले, सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक कधी होणार?

या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सरकारला पाठविण्याबाबत महावितरणला सूचना देण्यात आल्या आहेत. सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पारदर्शक व सखोल चौकशी करण्यात येईल. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर छाननीनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे राऊत यांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com