Kalyan Dombivli News : लाखाचे 12 हजार भोवले! रजिस्ट्रार ठाणे ACBच्या जाळ्यात

Thane Acb Action in Kalyan Dombivali : बडा अधिकारी अडकला जाळ्यात...
 Thane News
Thane NewsSarkarnama
Published on
Updated on

Acb Action Kalyan Dombivali News :

घराचे रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधकाने 12 हजार रुपयांची मागणी केली. ठरलेली रक्कम स्वीकारताना सहाय्यक दुय्यम निबंधकासह खासगी इसमाला ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे दुय्यम निबंधक आणि उप निबंधकावर 15 दिवसांपूर्वीच एक गुन्हा कल्याण येथील कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

राज कोळी असे ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराने घर घेतल्याने घराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी राज कोळी यांनी तक्रारदाराकडे 24 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोड करत बारा हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. मात्र तोवर तक्रारदाराने याबाबत Thane एसीबीकडे याबाबत तक्रार दिली होती.

 Thane News
Job Opportunity in CIDCO : 'सिडको' महामंडळात होणार 101 सहाय्यक अभियंता पदांची भरती; त्वरित करा अर्ज!

एसीबीच्या पथकाने या गोष्टींची पडताळणी केली. ठरल्यानुसार तक्रारदार आज सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील सहदुय्यम निबंधक कार्यालयात आले. यावेळी तक्रारदाराकडून 12 हजार स्वीकारताना राज कोळी यांना ताब्यात घेतले. ठाणे अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत ही कारवाई केली आहे. राज कोळी यांच्यासोबत एका खासगी इसमालाही ठाणे अँटी करप्शन ब्युरोने ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

15 दिवसांपूर्वी दाखल झाला होता गुन्हा

मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या गाळ्याचे बनावट कागदपत्रे बनवून परस्पर दोन जणांच्या नावे करण्याचा प्रकार कल्याण येथे उघडकीस आला. मृत इसमाच्या नातवाने या फसवणूक प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.

या फसवणुकीत दुय्यम निबंधकासह प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्यासह इतर एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यावेळी देखील पालिका अधिकाऱ्यांसह उपनिबंधकावर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी दिली.

edited by sachin fulpagare

 Thane News
Pune Crime News: काय सांगता...! पोलिसांनीच टाकला दरोडा; पुण्यातील चार पोलिस निलंबित

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com