Sachin Vaze News: शंभर कोटी खंडणी वसुली प्रकरणात मोठा ट्विस्ट; सचिन वाझेचा ईडीच्या भूमिकेवर आक्षेप ?

Anil Deshmukh Case Updates : माफीचा साक्षीदार बनण्यासाठी ईडीने दिलेली सहमती मागे घेतली ?
Sachin Vaze
Sachin Vaze Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्याच्या राजकारणात मोठा धमाका उडवून देणाऱ्या शंभर कोटी खंडणी वसुली प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी तुरुंगात असलेले बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे हे माफीचा साक्षीदार होण्यास तयार आहेत. मात्र, माफीचा साक्षीदार बनण्यासाठी ईडीने दिलेली सहमती आता मागे घेतली आहे.

तर ईडीने दिलेली ही सहमती मागे का घेतली ? असा सवाल करत सचिन वाझेने ईडीच्या भूमिकेवरच आक्षेप घेतला आहे. यावर 18 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. त्यामुळे आता ईडीकडून न्यायालयाला काय उत्तर देण्यात येते, ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sachin Vaze
Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनात हिंगोली पोलिसांसाठी धावले संतोष बांगर! वेळेत जेवण न मिळाल्याने...

शंभर कोटी खंडणी वसुली प्रकरणात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाला होता. त्यानंतर देशमुखांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीने चौकशी केली, तसेच अनिल देशमुखांनाही अटक झाली होती. मात्र, सध्या देशमुख जामीनावर बाहेर आहेत.

दरम्यान, सचिन वाझे हे सध्या तळोदा कारागृहात असून मुंबई सत्र न्यायालयाला पत्र पाठवत माफीचा साक्षीदार बनण्यासाठी ईडीने दिलेली सहमती आता मागे का घेतली ? असा सवाल उपस्थित करत थेट ईडीच्या भूमिकेवरच आक्षेप घेतला आहे. आता यावर 18 डिसेंबरला ईडीकडून कोर्टात काय उत्तर सादर करण्यात येते, याकडे लक्ष असणार आहे.

(Edited by - Ganesh Thombare)

Sachin Vaze
Jashraj Patil News: अपघातग्रस्त रिक्षा काढण्यासाठी आमदारपुत्र उतरले खड्ड्यात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com