PM Kisan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना बुधवारी धनलाभाचा योग, बँक खात्यात सहा हजार रुपये जमा होणार!

16th installment of PM Kisan Yojana : पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम थेट जमा होणार आहे
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSarkarnama
Published on
Updated on

संजय परब-

Farmers of Maharashtra News : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना बुधवार 28 फेब्रुवारीला धनलाभ होणार आहे. शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून सहा हजार रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा केंद्राचा सोळावा हफ्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असे मिळून हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पीएम किसान योजने अंतर्गत 2000 रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून 4000 रुपये असा एकुण 6000 रुपयांचा लाभ राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Kisan Yojana
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी मागितली देवेंद्र फडणवीसांची माफी...

यवतमाळ येथे होणाऱ्या या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2000 रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6000 रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येते.

पीएम किसान योजनेअंतर्गत 24 फेब्रुवारी 2024 पर्यंत राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27638 कोटीचा लाभ जमा झालेला आहे. आता सोळावा हप्ता उद्या जमा होणार आहे.

PM Kisan Yojana
Basavraj Patil BJP Entry : बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशामागे अशोक चव्हाण नव्हे; तर हे केंद्रीय मंत्री!

केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी रक्कम 1943.46 कोटींचा लाभ राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकुण 87.96 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. राज्यात कृषि विभागामार्फत गावपातळीवर विशेष मोहीमेद्वारे राज्यातील सुमारे 18 लाख लाभार्थींची पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झालेली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com