पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. पालघर जिल्ह्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यासह अनेक विकासकामांचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं. महाराष्ट्र देशाच्या विकासात मोठं योगदान देत आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी महायुती सरकारचं कौतुक केलं. महायुती सरकारच्या नेतृत्वात 'महाराष्ट्र महिला सशक्तीकरणात देशाला दिशा देण्याचे काम करत आहे. आज महाराष्ट्रात अनेक महिला उत्तम काम करत आहेत, असंही मोदींनी (Narendra Modi) सांगितलं.
मोदींनी म्हणाले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक काम करत आहेत. तर राज्याच्या पोलिस दलांच्या प्रमुख 'डीजीपी' म्हणून रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या नेतृत्व करत आहेत. पहिल्यांदाच राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर शोमिता बिश्वास लीड करत आहेत. राज्य शासनाच्या वेगवेगळ्या शासकीय विभागांत कार्यरत असलेल्या महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
राज्याच्या कायदाच्या मुख्य अधिकारी म्हणून सुवर्णा केवळे मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच राज्याच्या प्रिंसिपल अकाउंट जनरल म्हणून जया भगत मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. प्राची स्वरूप सीमाशुल्क विभागाचे नेतृत्व करत आहेत. मुंबईचे ड्रीम प्रोजेक्ट असणारे मेट्रो - ३ चे नेतृत्व मुंबई मेट्रोच्या एमडी अश्विनी भिडे (Ashwini Bhide) करत आहेत. अशा विविध विभागातील अनेक वरिष्ठ महिला अधिकारी सक्षणपणे त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतांना दिसतात.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक विभागात सुद्धा महिलांनी स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र हेल्थ यूनिवर्सिटीच्या कुलपती म्हणून लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर (Madhuri Kanetkar) नेतृत्व करत दिसतात. त्याच्या या कार्यतून 21व्या शतकातील महिला समाजाला दिशा देत आहेत, असे मत मोदींनी यावेळी व्यक्त केले. तसेच डॉ. अपूर्वा पालकर (Dr. Apurva Palkar) या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे (MSSU) संस्थापक कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रातील मुख्य पदांवर महिला काम करताना दिसतात ही खूप अभिमानाची बाब आहे, असेही मोदी म्हणाले.
या महिलांचे यश देशाच्या विकासासाठी हातभार असणार आहे, ही नारी शक्ती नक्कीच विकसित भारताचा मोठा आधार बनणार आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' हे 'एनडीए' सरकारचं मंत्र आहे. सर्वाच्या साथीनेच महाराष्ट्राला विकासाच्या नव्या स्थानी घेऊन जाऊ शकू असेही मोदी यावेळी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.