Shirur Loksabha : अजितदादांनी कोल्हेंना ‘टार्गेट’ करताच शिरूरसाठी विलास लांडेंनी दंड थोपटले..!

NCP Candidature : महायुतीकडून विलास लांडे यांनी शड्डू ठोकल्यानंतर आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे टेन्शन वाढले आहे.
Shivajirao Adhalrao patil-Vilas Lande
Shivajirao Adhalrao patil-Vilas LandeSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून (शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस) जवळपास निश्चित झाल्याने ते तयारीला लागले आहेत. त्यांच्याविरुद्ध महायुतीकडून तीन टर्म खासदार राहिलेले मंचरच्या लांडेवाडीचे (ता. आंबेगाव) शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे नाव घेतले जात असून तेसुद्धा तयारीत आहेत. दरम्यान, आता भोसरीच्या लांडेवाडीचे विलास लांडे-पाटील यांनीही शिरूरमधून दंड थोपटले आहेत. त्यामुळे कुठल्या लांडेवाडीच्या पाटलाला महायुती संधी देणार, याची उत्सुकता आहे. (Vilas Lande wants to contest Lok Sabha elections from Shirur)

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज नाव न घेता खासदार अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जिवाचं रान केलं होतं. पण, आता मी तिथे दिलेला उमेदवार निवडून आणणार', असा दावा त्यांनी केला. तो आपल्यासाठी ग्रीन सिग्नल समजून विलास लांडेंनी लगेचच दंड थोपटले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivajirao Adhalrao patil-Vilas Lande
Adinath Sugar Factory : ‘सावंत, राम शिंदे अन्‌ नारायण पाटलांनी बारामती ॲग्रोला आदिनाथ मिळू दिला नाही’

अजितदादांनी संधी दिली, तर शिरूरमधून लढू, मी शंभर टक्के इच्छूक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. साडेपाच लाख मतदार असलेल्या भोसरीत भाजपचे महेश लांडगे आमदार असल्याने राष्ट्रवादीचा (अजित पवार) खासदार शिरूरमध्ये शंभर टक्के होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार, हे अजित पवारांच्या ताज्या विधानावरून पुन्हा स्पष्ट झाले आहे. फक्त उमेदवार कोण हाच आता प्रश्न राहिला आहे. माजी खासदार आढळराव यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याची चर्चा नुकतीच झाली. त्यावेळी ते अमेरिकेत होते. पण, त्यांनी यावर आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही.

दरम्यान, विलास लांडेंनी शड्डू ठोकल्यानंतर आता आढळरावांचे टेन्शन वाढले आहे. कारण अजितदादांनी शिरूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असून तेथून ते ठरवतील तोच उमेदवार राहणार आहे. त्याला निवडून आणण्यासाठी ते कुठलीही कसर सोडणार नाहीत.

Shivajirao Adhalrao patil-Vilas Lande
Nagar Politics : संगमनेरला चांगल्या बॅट्‌समनची गरज, फिल्डिंगचं माझ्यावर सोडा; विखेंनी पुन्हा थोरातांना डिवचलं

विलास लांडे हे 2009 मध्ये शिरुरमधून लढले होते. त्यावेळी त्यांचा आढळरावांनी पराभव केला होता. त्यानंतर त्याचवर्षी विधानसभेला पक्षाने त्यांना भोसरीतून तिकिट दिले नाही. म्हणून ते अपक्ष म्हणून लढले आणि निवडून आले. पुढे 2014 ला मात्र अपक्ष असलेले त्यांचे भाचे जावई महेश लांडगे यांनी त्यांचा पराभव केला. ते 2019 ला लोकसभेला इच्छूक होते. पण, पक्षाने डॉ. कोल्हे यांना संधी दिल्याने ते शांत राहिले.

विधानसभेला राष्ट्रवादीच्या वाट्याला भोसरी असूनही त्यांनी तेथे उमेदवारच दिला नाही, त्यामुळे लांडे पुन्हा अपक्ष म्हणून लढले. पण, भाजपच्या महेश लांडगेंपुढे त्यांचा टिकाव लागला नव्हता. लांडगेंचेच नाव 2024 च्या लोकसभेसाठी युतीकडून घेतले जात होते. पण, अजित पवार युतीच्या सत्तेत सहभागी झाले आणि त्यांचे नाव मागे पडले. कारण अजितदादांनी शिरूरवर दावा केला आहे.

Edited By : Vijay Dudhale

Shivajirao Adhalrao patil-Vilas Lande
Manikrao Thakare : तेलंगणात विजय मिळवून देणाऱ्या माणिकराव ठाकरेंना ‘लॉटरी’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com