PMPML News : पुण्याच्या PMPMLचा वेग वाढणार: नव्या अध्यक्षांचा सुधारणा आणि नवकल्पनांचा गिअर

PMPML initiatives 2025 : पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीत क्रांती! पंकज देवरे यांचा ठोस निर्णयांचा धडाका. सीसीटीव्ही थेट प्रक्षेपण, ट्रान्झिट हब, हायड्रोजन बस – पीएमपीत बदलाची लाट
PMPML News
PMPML NewsSarkarnama
Published on
Updated on

सारांश

  1. पीएमपीला नवीन अध्यक्ष मिळाले असून त्यांच्याकडून वेगवान निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.

  2. सेवा सुधारणा, नियोजनबद्ध वाहतूक आणि प्रवाशांसाठी नवकल्पना राबविण्यावर भर दिला जात आहे.

  3. नागरिकांना दर्जेदार व वेळेवर सेवा देण्याचा निर्धार नव्या नेतृत्वाकडून दिसतो आहे.

Pune News : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली पीएमपी (पुणे महानगर परिवहन महामंडळ) आता नव्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात वेगळी दिशा घेत आहे. नव्याने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंकज देवरे यांनी कामकाजाला झपाट्याने सुरुवात केली आहे. केवळ शाश्वत इंधनाच्या वापरापुरती मर्यादा न घालता, पीएमपी आर्थिकदृष्ट्याही सक्षम व्हावी यासाठी त्यांनी ठोस निर्णयांची मालिका सुरु केली आहे.

कार्यभार स्वीकारताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पीएमपीशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. स्थानिक ठेकेदारांना स्पष्ट शब्दांत प्रवासी हेच आमचं प्राधान्य असल्याचं ठणकावत, कर्मचाऱ्यांनाही विश्वासात घेण्याचं धोरण स्वीकारलं आहे. पीएमपीचा खरा कणा हे कर्मचारी असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

देवरे यांच्या नेतृत्वात अनेक तांत्रिक सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत. बसमधील सीसीटीव्हीच्या थेट प्रक्षेपणाची सुविधा अध्यक्षांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे बसमधील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांवर थेट देखरेख ठेवता येणार आहे. बस बंद पडल्यास त्याचा रिअल-टाइम इशारा स्क्रीनवर दिसेल, अशी यंत्रणा उभारण्यात येत आहे.

PMPML News
PM Kisan Yojana : PM किसान योजनेचा हप्ता आज खात्यात जमा होणार; पैसे आले की नाही असं करा चेक!

या व्यतिरिक्त, डबल डेकर बस, हायड्रोजन बसची जोड, आगारांचा पुनर्विकास, चालकांसाठी तपासणी यादी अनिवार्य करणे आणि बालेवाडी येथे ट्रान्झिट हब उभारणे यांसारख्या अनेक उपक्रमांना गती देण्यात आली आहे.

या सगळ्याचा उद्देश केवळ प्रवाशांच्या सुविधांचा दर्जा उंचावणे नसून, पीएमपीला आर्थिकदृष्ट्याही सक्षम बनवणे हाच आहे. या सकारात्मक हालचालीमुळे पीएमपीचा प्रवास नव्या यशाकडे होईल, अशी पुणेकरांना आशा आहे.

PMPML News
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, नवीन वेतन आयोगामुळे पगारात मोठी उसळी?

प्र.1: पीएमपीचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
उ: पीएमपीचे नवे अध्यक्ष पंकज देवरे आहेत

प्र.2: नव्या अध्यक्षांकडून काय बदल अपेक्षित आहेत?
उ: सेवा गुणवत्ता, वेळपालन आणि नवकल्पनांची अंमलबजावणी.

प्र.3: प्रवाशांना याचा काय फायदा होईल?
उ: प्रवाशांना वेळेवर, स्वच्छ व सुलभ सेवा अनुभवता येईल.

प्र.4: पीएमपीतील सुधारणा कधीपासून लागू होतील?
उ: काही उपाय तात्काळ तर काही टप्प्याटप्प्याने राबवले जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com