Maharashtra Government : फडणवीस सरकारचा एक निर्णय अन् पुणे महापालिकेला 40 कोटींचा फटका; हाती केवळ भोपळा

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारने पीएमआरडीएचा 23 गावांचा विकास आराखडा रद्द केला. या निर्णयामुळे पुणे महापालिकेचे सिंगापूर कंपनीला दिलेले तब्बल 40 कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.
Pune Municipal Corporation suffers ₹40 crore loss after Maharashtra government cancels PMRDA’s controversial 23-village development plan prepared by a Singapore-based firm.
Pune Municipal Corporation suffers ₹40 crore loss after Maharashtra government cancels PMRDA’s controversial 23-village development plan prepared by a Singapore-based firm.Sarkarnama
Published on
Updated on

PMRDA News : पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएचा 23 गावांचा वादग्रस्त प्रारूप विकास आराखडा (Development Plan) राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी रद्द केला. शनिवारी (27 सप्टेंबर ) हा आराखडा रद्द केल्याची अधिसूचना काढली आहे. पण या निर्णयामुळे आता पुणे महापालिकेचे तब्बल 40 कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. पीएमआरडीने हा डीपी तयार करण्यासाठी सिंगापूरच्या एका कंपनीला तब्बल ४० कोटी रुपये दिले होते. तो खर्च आता वाया गेला आहे.

राज्य शासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड या 2 महापालिका, 7 नगर परिषदा आणि 842 गावांचा समावेश करून तिथल्या नियोजनबद्ध विकासासाठी 2015 मध्ये MMRDA च्या ‘PMRDA’ची स्थापन केली. ‘PMRDA’ला डीपी तयार करण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता दिली. 2021 मध्ये प्रारूप विकास आराखडा जाहीर झाला. यावर 67 हजार हरकती, सूचना प्राप्त झाल्या होत्या. हा आराखडा तयार केला जात असतानाच 2021 मध्ये ग्रामीण भागातील आणखी 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट केली गेली.

इथून खरा वाद सुरु झाला. या 23 गावांचा विकास आराखडा आराखडा तयार करण्याचे अधिकार ‘पीएमआरडीए’ला नाही तर पुणे महापालिकेला आहे, असा दावा महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केला होता. पण राज्यातील तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारने भाजपची ही मागणी फेटाळून लावली. याविरोधात काही संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने मार्च 2023 मध्ये याला अंतरिम स्थगिती दिली. आता हे प्रकरण निकाली निघत असतानाच अखेर हा प्रारूप डीपी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Pune Municipal Corporation suffers ₹40 crore loss after Maharashtra government cancels PMRDA’s controversial 23-village development plan prepared by a Singapore-based firm.
Pune Graduate Constituency: 48 हजार मतांनी भाजपाच्या उमेदवाराला धूळ चारली, याची पुनरावृत्ती होणार का? काँग्रेसचा पुन्हा मास्टरस्ट्रोक

मुख्यमंत्री तथा ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जुना प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याची अधिसूचना काही दिवसांपूर्वी काढण्यात आली आहे. आता ‘पीएमआरडीए’कडून डीपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर पुणे महापालिकेनेही समाविष्ट 23 गावांचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी सुमारे एका महिन्यापूर्वी राज्य शासनाला पत्र लिहून 23 गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र त्यावर अद्याप शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com