Chandrapur : धानपिकाच्या नोंदणीसाठी मुदतीत डिसेंबर अखेरपर्यंत वाढ

Paddy Crop : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांना मोठा लाभ; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता पाठपुरावा
Minister Sudhir Mungantiwar.
Minister Sudhir Mungantiwar.Google
Published on
Updated on

Important Decision : विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,नागपूर जिल्हे धान उत्पादक म्हणून ओळखले जातात. यंदा अतिवृष्टीमुळे धानपिकाचे मोठे नुकसान झाले होते. बदलत्या वातावरणामुळे डिसेंबर महिना सुरू होत असतानादेखील अनेक शेतकऱ्यांचे धानपीक निघायचे आहे. अशा अवस्थेत आधारभूत योजनेअंतर्गत नेमून दिलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी करू इच्छिणाऱ्या

शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहू नये, यासाठी धान नोंदणीची मुदत वाढविण्यात आली आहे. राज्याचे वन, सांस्कृती कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत सरकारनं आता ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. (Due Date For Paddy Crop Registration Extended Till December 2023 After Efforts Of State Minister Sudhir Mungantiwar)

Minister Sudhir Mungantiwar.
Sudhir Mungantiwar on Reservation : अर्धा डझन मराठा मुख्यमंत्री झाल्यावरही ओबीसी नेत्यांच्या दोषाचा प्रश्नच कुठेय?

सरकारनं वाढविलेल्या या मुदतीमुळं पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये धानाचं पीक मोठ्या प्रमाणावर होतं. आधारभूत योजनेअंतर्गत हे शेतकरी नेमण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी करतात. नोंदणीनंतर ते केंद्रात धानविक्री करतात. सध्या पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यांत खरेदी केंद्राची संख्या मोजकी आहे. अशातच अनेक गावांमध्ये इंटरनेट नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळं धानाच्या नोंदणीला विलंब होतो.

अवकाळी पावसाची स्थिती गेल्या काही दिवसांपासून विदर्भात निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या धानपिकाची नोंदणी विहित मुदतीत करायची तरी कशी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. नोंदणी केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही तुलनेने जास्त आहे. अशात यावर्षी पहिल्यांदाच अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पीक अद्यापही निघायचे आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा विदर्भाला बसत आहे. अशात शेतकऱ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता धान नोंदणीची मुदत वाढविण्यात यावी, असा आग्रह सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्याशी फोनवर चर्चा केली व त्यांना पत्रही दिले. चर्चेदरम्यान शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी त्यांनी भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला. मुनगंटीवार यांनी केलेल्या मागणीची भुजबळ यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी यासंदर्भात संबंधित विभागाला तातडीने निर्देश दिले. निर्देशांनंतर लगेच धाननोंदणीची मुदत वाढविण्यात आली.

आता धान उत्पादक शेतकऱ्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. धानाचे पीक निघण्याच्या ऐन तोंडावर विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे धानपिकाला मोठा फटका बसला आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्येच धानाचं पीक कापणीवर येतं. यंदा धान कापणीला विलंब झाला आहे. बदलत्या हवामानामुळं व अवकाळी पावसामुळं बऱ्याच धानपिकाचे नुकसान झाले आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Minister Sudhir Mungantiwar.
Chandrapur : सरपंच, सचिवासह ग्रामपंचायत सदस्यांना डांबून ठेवले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com