Mahapalika Election : भाजपवर अभूतपूर्व नामुष्की; 'कमळा'च्याच पराभवासाठी लावावी लागली फिल्डींग, अपक्षाला पाठिंबा, काय घडलं?

Ulhasnagar municipal election : उल्हासनगरातील या विचित्र स्थितीमुळे ही निवडणूक चर्चेत आली आहे. यामध्ये मतदारांचाही मोठा गोंधळ उडणार आहे.
Ulhasnagar BJP Politics
Ulhasnagar BJP PoliticsSarkarnama
Published on
Updated on

BJP supports independent candidate : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत राज्यात मोठा भाऊ ठरलेल्या भाजपने महापालिका निवडणुकांमध्ये ताकद दाखवून देण्यासाठी कंबर कसली आहे. उमेदवार निवडीपासून त्याची सुरूवात झाली. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण इच्छूक होते. त्यातून काही भागात प्रचंड नाराजीचा सामनाही करावा लागला. नंतर काहींचे बंड थोपविण्यात आले. मात्र, सध्या राज्यात एका उमेदवाराची जोरदार चर्चा होत आहे. त्या उमेदवारामुळे भाजपवर कमळाच्याच पराभवासाठी प्रचार करण्याची नामुष्की ओढवली आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक १९ ब मध्ये भाजपने एका अपक्ष महिला उमेदवार कोमल लहरानी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या जागेवर कमळ चिन्हावर लक्ष्मी कुर्सेजा या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने रणनीती आखली असून नेत्यांना कामाला लावले आहे.

नेमकं काय घडलं?

भाजपने सुरूवातीला पक्षाचे तत्कालीन मंडल अध्यक्ष बंटी कुर्सिजा यांच्या पत्नी लक्ष्मी यांना एबी फॉर्म दिला होता. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी लहरानी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करत त्यांनाही एबी फॉर्म दिला. त्यानुसार लहरानी यांनी अर्ज दाखल केला. अर्ज छाननीमध्ये कुर्सिजा यांचा अर्ज आधी आल्याने त्यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरण्यात आला. तर लहरानी अपक्ष उमेदवार ठरल्या.

Ulhasnagar BJP Politics
Supreme Court : SC, ST, OBC प्रवर्गाला सर्वात मोठा दिलासा; भरती प्रक्रियेतील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

कुर्सिजा या आपला अर्ज मागे घेतील, अशी भाजप नेत्यांना अपेक्षा होती. त्यासाठी बंटी कुर्सिजा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र, संपर्क झाला नाही. कुर्सिजा यांनी अर्ज मागे न घेतल्याने साहजिकच भाजपच्या अधिकृत उमेदवार आणि चिन्हही त्यांनाच मिळाले. त्यामुळे भाजपचीच चांगलीच कोंडी झाली. मात्र, भाजपनेही माघार न घेता लहरानी या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.

उल्हासनगरातील या विचित्र स्थितीमुळे ही निवडणूक चर्चेत आली आहे. यामध्ये मतदारांचाही मोठा गोंधळ उडणार आहे. भाजप नेत्यांना कमळाविरोधात प्रचार करावा लागत असून अपक्ष उमेदवारासाठी फिल्डींग लावण्यात आली आहे. दरम्यान, कुर्सिजा यांनी कमळाला जिंकून आणायचे आहे, असे आवाहन केले आहे. तिकीट मिळाले नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट मिळविणाऱ्यांपैकी मी नाही. मी भाजपमधून सुरूवात केली होती. आजही भाजपचे चिन्ह आम्हाला मिळाले आहे. आम्ही शंभर टक्के विजयी होऊ, असा विश्वास बंटी यांनी व्यक्त केला आहे.

Ulhasnagar BJP Politics
Priyanka Gandhi News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्यांदाच घेतला मोठा निर्णय; प्रियांका गांधी मिळवून देणार सत्ता?

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया म्हणाले, चुकून एबी फॉर्म बंटी कुसरेजा यांना देण्यात आला होता. नंतर आम्ही त्यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मोबाईल बंद ठेवला होता. त्यांनी पक्षाचे आदेशाचे पालन न करता मीडियाला सांगितले की आपण अधिकृत उमेदवार आहोत. आता पक्षाने मंडल अध्यक्ष पदावरून त्यांना हटवून सिंधूताई शर्मा यांना मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com