Police Transfer : नाशिक पोलिसात खांदेपालट, तब्बल 27 निरीक्षकांच्या रातोरात बदल्या; काय आहे कारण?

Police Transfer : 'आगामी निवडणुका सुरक्षित आणि कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय पार पडावे..'
Nashik Police Transfer News :
Nashik Police Transfer News :Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी ग्रामीण पोलिस यंत्रणेत मोठे खांदेपालट केली आहे. 27 हून अधिक पोलिस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांच्या एका रात्रीत बदल्या झाल्या आहेत. यामुळे या बदल्यांच्या भोवती आगामी लोकसभा निवडणुका आणि सुरक्षा-कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने या बदल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Nashik Police Transfer News :
NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निकाल फेब्रुवारीत, असे आहे सुनावणीचे वेळापत्रक

या संदर्भात काल रात्री पोलिस अधीक्षक उमप यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या बदल्या करण्यात आले आहेत. यामध्ये तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनही एकाच पोलिस ठाण्यात असलेल्या, तसेच गुन्ह्यांचे तपास प्रलंबित असलेल्या आणि निवृत्तीसाठी सहा महिने कालावधी शिल्लक असलेल्या, जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुका सुरक्षित आणि कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय पार पडावे, यासाठी आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार या बदल्या करण्यात आले आहेत.

Nashik Police Transfer News :
Nashik tour : उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर; धुसफुस मात्र मनसैनिकांत..!

पोलिस निरीक्षकांच्या नव्या नियुक्त खालीलप्रमाणे -

(कंसात जुने ठिकाण)

पांडुरंग पवार (येवला) विशेष शाखा, संजय गायकवाड (नियंत्रण कक्ष) सुरगाणा, वसंत पथवे (नियंत्रण कक्ष) पेठ, राजेंद्र कुटे (सिन्नर) दोष सिद्धी, यशवंत बाविस्कर (ओझर विमानतळ) सिन्नर एमआयडीसी, बापूसाहेब महाजन (निफाड) मानव संसाधन, सारिका अहिरराव (नाशिक तालुका) वाढीवर्ह, शाम निकम (एमआयडीसी सिन्नर) महिला सुरक्षा, अशोक पवार (पिंपळगाव बसवंत) ओझर, राजू सुर्वे (इगतपुरी) स्थानिक गुन्हे, बाजीराव पोवार (विशेष शाखा) सटाणा, दुर्गेश तिवारी (ओझर) पिंपळगाव बसवंत, रवींद्र मगर (मालेगाव) आर्थिक गुन्हे, रघुनाथ शेगार (छावणी) दिंडोरी, सुनील भाबड (नियंत्रण कक्ष) मालेगाव वाहतूक कक्ष, राजेंद्र भोसले (कॅम्प पोलिस ठाणे) नियंत्रण कक्ष, सत्यजित आमले (नियंत्रण कक्ष) नाशिक तालुका, नंदकुमार कदम (येवला) निफाड, राहुल तसरे (आर्थिक गुन्हे शाखा) इगतपुरी.

नव्याने हजर झालेल्या अरुण धनवडे-नियंत्रण कक्ष, राहुल खताळ- मालेगाव तालुका, राजेंद्र पाटील-छावणी पोलिस ठाणे, चंद्रशेखर यादव- सिन्नर पोलिस ठाणे, विलास पुजारी- येवला, संजय सानप- मालेगाव शहर, शिवाजी डोईफोडे- मालेगाव किल्ला, सोपान शिरसाट- कळवण येथे बदली करण्यात आली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com