Pune Corporation : चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे पुण्यात ४२ प्रभाग अन् १६६ नगरसेवक

Political News : महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदल करीत पुणे महापालिकेची निवडणूक तीन सदस्यांऐवजी चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेत चार सदस्यीय प्रभागाऐवजी तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यात आले. त्यानंतर हे सर्व प्रकरण कोर्टात गेले होते. या सरकारने महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदल करीत पुणे महापालिकेची निवडणूक तीन सदस्यांऐवजी चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांऐवजी चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुण्यात ४२ प्रभागातून १६६ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. तीनच्या प्रभागाच्या तुलनेत चारच्या प्रभागामध्ये नगरसेवकांची संख्या ७ ने कमी होणार आहे.

Pune Municipal Corporation
Rupali Chakankar : 'बेडूक फुगला की त्याला बैल झाल्यासारखं वाटतं...',चाकणकरांनी खासदार कोल्हेंना डिवचलं

पुणे महापालिकेची (Pune Carporation) २०१७ ची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेतून झाली होती. २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांनी मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. तसेच नगरसेवकांची संख्याही वाढविण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार पुणे महापालिकेत ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार होते.

निवडणूक आयोगाच्या (Election Commision ) आदेशानुसार महापालिकेने प्रभाग रचना अंतिम केली होती, पण या प्रभाग रचनेवरून न्यायालयात याचिका दाखल झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता या निवडणुका फेब्रुवारी २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्य सरकारने गुरुवारी (ता. २९) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत तर आज (ता.१) विधीमंडळात यासंदर्भातील विधेयक मंजूर केले.

असे आहे प्रभाग रचनेचे गणित

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या २०१६ कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार महापालिकेत ३० लाख लोकसंख्येला १६१ नगरसेवक आणि त्या पुढील प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी एका नगरसेवकाची संख्या वाढवली जाते. आगामी महापालिका निवडणुका या २०११ च्या जनगणनेच्या आधारावर होणार आहेत. तेव्हा पुणे शहराची लोकसंख्या ३१ लाख २४ हजार इतकी होती. तर ११ गावांची लोकसंख्या सुमारे दीड लाख आणि २३ गावांची लोकसंख्या अडीच लाखाच्या घरात होती. जुन्या आणि नव्या हद्दीची एकूण लोकसंख्या सुमारे ३५ लाख ५० हजाराच्या जवळपास जाते. त्यामुळे ३० लाखानंतर प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक या प्रमाणे पुण्यात १६६ नगरसेवक असणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चारच्या प्रभागाची संख्या ४० किंवा ४१

१६६ सदस्यांची विभागणी करताना राजकीय डावपेच महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे यामध्ये दोन पर्यायांची विचार होऊ शकतो. पर्याय एकः ४१ प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग दोन नगरसेवकांचा केला जाऊ शकतो. पर्यात दोनः ४० प्रभाग हे चार सदस्यांचे आणि दोन प्रभाग तीन सदस्यांचे केले जाऊ शकतात.

फुरसुंगीमुळे प्रभाग रचना बदलू शकते

राज्य सरकारने फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यास सध्या स्थगिती देण्यात आली आहे. ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्याचा अंतिम निर्णय न्यायालयात झाला तर या दोन गावांची लोकसंख्याही वगळली जाईल. त्यामुळे त्याचा परिणाम प्रभाग रचनेवर होण्याची शक्यता आहे.

(Edited By: Sachin Waghmare)

Pune Municipal Corporation
PMC Budget 2024: यंदाचे पुणे महापालिकेचे बजेट 10 हजार कोटींचा टप्पा गाठणार ?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com