Pune News: पुणेकरांनो 'हे' तीन दिवस महत्वाचे, टॅक्समध्ये मिळणार तब्बल 'एवढे' टक्के सवलत

Pune Municipal Corporation News: पुणे शहरात 14.22 लाख इतकी मिळकतकर भरणाऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी 4 लाख 94 हजार 706 मिळकतधारकांनी आतापर्यंत 836 कोटी रुपयांता कर भरलेला आहे. या कर भरणाऱ्यांपैकी 70 टक्के नागरिकांनी 521 कोटी 54 लाख रुपये हे ऑनलाइन पद्धतीने भरले आहेत
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama

Pune Municipal Corporation: पुणेकरांना आपले पैसे वाचवण्याची चांगली संधी महापालिकेने (PMC) उपलब्ध करुन दिली आहे. मात्र ही संधी केवळ तीन दिवसांसाठी मर्यादित असणार आहे. मिळकतकर (Income Tax) भरणाऱ्या नागरिकांना 3 दिवसांपर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यानुसार 31 मे पर्यंत ज्यांचा मिळकतकर 25 हजारापेक्षा कमी आहे, त्यांना 10 टक्के तर 25 हजारापेक्षा जास्त कर असणाऱ्यांना 5 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे मिळकतकर भरून 5 ते 10 टक्क्यांची सवलत घेण्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत.

आज (28 मे) सायंकाळपर्यंत महापालिकेच्या (PMC) तिजोरीत 836 कोटी 8 लाख रुपये जमा झाले आहेत. तर अद्याप ज्या नागरिकांनी मिळकतकर भरलेला नाही ते नागरी सुविधा केंद्रात कर भरु शकतात. तसेच नागरिकांच्या सोईसाठी 31 मे पर्यंत शहरातील नागरी सुविधा केंद्र सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु ठेवली जाणार असल्याची माहिती मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महापालिकेतर्फे दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या दोन महिन्यात मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात सूट दिली जाते. त्यानुसार मिळकतकर 25 हजारापेक्षा कमी असेल त्यांना 10 टक्के, तर 25 हजारापेक्षा जास्त कर असणाऱ्यांना 5 टक्क्यांची सवलत देण्यात येते. सध्या शहरात 14.22 लाख इतकी मिळकतकर भरणाऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी 4 लाख 94 हजार 706 मिळकतधारकांनी आतापर्यंत 836 कोटी रुपयांता कर भरलेला आहे.

...1 जून पासून सवलत बंद

या कर भरणाऱ्यांपैकी 70 टक्के नागरिकांनी 521 कोटी 54 लाख रुपये हे ऑनलाइन (Online) पद्धतीने भरलेले आहेत. तर पैसे भरण्यासाठी अनेकांनी ऑनलाइन प्रणालीला पसंती दिल्याचं दिसत आहे. मात्र काही नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने पैसे भरता येत नाहीत. त्यांची अडचण लक्षात घेत आता नागरी सुविधा केंद्र सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय उपायुक्तांनी घेतला आहे.

Pune Municipal Corporation
Pune Hit And Run Case Update : डॉ. तावरे, हाळनोरच्या डोक्यावर निलंबनाची टांगती तलवार; पोलिसांचा प्रस्ताव तयार

महत्वाची बाब म्हणजे मिळकतकरावर ही सवलत ही केवळ 31 मे पर्यंत मिळणार आहे. 1 जून पासून कोणतीही सवलत मिळणार नाही. त्यामुळे पुणेकरांनी लवकरात लवकर या तीन दिवसात मिळकतकर भरून 5 ते 10 टक्क्यांची सवलत घेण्याचे आवाहन जगताप यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com