Pune News : पुणेकारांची वाहतूक कोंडीतून सुटका, रस्तेही घेणार मोकळा श्वास!; वाहतूक कोंडी 53 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा

Good News for Pune : पुण्यातील वाहतूक कोंडीवरून अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. याचा राजकीय नेत्यांना देखील फटका बसला आहे. यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला होता. यादरम्यान येथील वाहतूक कोंडी 53 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.
pune traffic
pune trafficsarkarnama
Published on
Updated on

Pune News : दोन एक महिन्यांच्या आधी जगभरातील वाहतूक कोंडीबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. ज्यात पुण्याचेही नाव होते. तर पुण्यातील वाहतूक कोंडी जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले होते. तर अनेकदा याचा फटका सर्वसामान्यांसह राजकीय व्यक्तींना देखील बसला आहे. यावरून एनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहे. पण आता येथील वाहतूक कोंडी 53 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा पुणे पोलिसांनीच केला आहे. हा दावा पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

पुणे पोलिसांनी गुरूवारी (ता.27) पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील वाहतूक कोंडीबाबत माहिती दिलीय. यावेळी पोलिसांनी पुणे शहरातली वाहतूक कोंडी निम्म्याने कमी झाल्याचा दावा करताना ती 53 टक्क्यांनी कमी झाल्याचं दावा करताना वाहतुकीचा वेगही वाढल्याचे म्हटलं आहे. पुणे पोलिसांनी हा दावा वाहतूक कोंडीचा अभ्यासावरून सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर केला आहे.

पोलिसांनी पुणे शहरातली वाहतूक कोंडीवरून माहिती देताना, एटीएमएस प्रणाली (अडपटीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम), गुगल मॅप्स, नागरिकांच्या तक्रारी व सोशल मिडिया यांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडीचा अभ्यास केला. त्याचे विश्लेषणात्मक करून वाहतुक मार्ग आणि वाहतुकीत सुधारणा केली. यामुळे वाहतुकीचा वेग 10.43 टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले.

pune traffic
Pune traffic jam issue : 'पुण्यातील वाहतूक कोंडीबाबत काँग्रेसने बोलणं म्हणजे..' ; धीरज घाटेंनी लगावला टोला!

तर फक्त वाहतुक मार्ग आणि वाहतुकीत सुधारणा न करता, वाहतूक नियंत्रण शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, सिग्नल यंत्रणेतील बदल, ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्थे केल्याने बदल होईल, असेही पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. याशिवाय नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा वेग वाढवण्यात आला असून यात दुप्पट वाढ झाल्याचेही पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com