Railway Recruitment : रेल्वे संरक्षण दलात नोकरीची संधी; 2,250 पदांसाठी मेगा भरती

Railway Recruitment: रेल्वे संरक्षण दलात नोकरीची संधी; 2250 पदांसाठी मेगा भरती
Railway Recruitment
Railway RecruitmentSarkarnama
Published on
Updated on

केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडून संरक्षण दलातील विविध पदाxच्या मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वे संरक्षण दलाकडून (RPF) तब्बल 2,250 पदे भरली जाणार आहेत. तरुणांना रेल्वे सुरक्षा दलात नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. या भरतीचा सविस्तर तपशील जाणून घेऊयात.

भारतीय रेल्वे विभागाकडून विविध पदांची सातत्याने भरती केली जात आहे. त्यातच आता भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे संरक्षण दलामध्ये पोलिस उपनिरीक्षक (Sub-Inspector) आणि हवालदार (Constable) या पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये 250 पदे ही पोलिस उपनिरीक्षकपदाची, तर हवालदार या पदासाठी 2000 जागांची भरती केली जाणार आहे.

या भरतीसाठी उपनिरीक्षकपदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही 20 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच उपनिरीक्षकपदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असला पाहिजे. त्याचप्रमाणे हवालदार या पदासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 23 दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार हा दहावी उत्तीर्ण झालेला असावा. राखीव प्रवर्गावील उमेदवारासाठी वयाच्या अटीत रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डाच्या नियमानुसार शिथिलता देण्यात आली आहे.

या भरतीमध्ये एकूण पदसंख्येतील 15% पदे ही महिलांसाठी राखीव असतील, तर 10% पदे ही एक्स सर्व्हिसमॅनसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा, तसेच शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.

कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड केली जाणार आहे. या भरतीच्या परीक्षेसाठी उमेदवारांना 90 मिनिटांचा वेळ दिला जाणार असून 120 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 2 मार्क दिले जाणार आहेत.

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. त्यासंदर्भात रेल्वे रिक्रूटमेंन्ट बोर्डच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी रेल्वेच्या संकेतस्थळावर भेट देऊन त्याची माहिती घेणे आवश्यक आहे. यासाठी भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी rpf.Indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.

Edited by: Mangesh Mahale

R...

Railway Recruitment
Mumbra News : अजितदादा गटानं आव्हाडांच्या बालेकिल्ल्यातच लावला सुरुंग; चक्रव्युहात अडकवलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com