
Railway Bonus: दिवाळीपूर्वीच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी बोनसला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा १० लाख ९० हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. यामुळं देशभरातील रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
वैष्णव यांनी बोनसची घोषणा करताना म्हटलं की, "प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस आज कॅबिनेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली. यामध्ये ७८ दिवसांचा एक १,८६६ कोटी रुपयांचा बोनस रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. जवळपास १० लाख ९० हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे"
दरम्यान, PLBची जास्तीत जास्त देय रक्कम ही ७८ दिवसांइतकी होते, ही रक्कम प्रत्येक पात्र कर्मचाऱ्यासाठी 17,951 इतकी असते. ही रक्कम विविध पदांवरील रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यामध्ये ट्रॅक मेंटेनर, लोकोमोटिव्ह पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, सुपरवायझर, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ हेल्पर, पॉईंट्समन, मंत्रालयातील कर्मचारी आणि इतर 'क' गटातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सरकारनं म्हटलं की, २०२४-२५ मध्ये रेल्वेची कामगिरी अत्यंच चांगली राहिली आहे. भारतीय रेल्वेनं हे रेकॉर्ड केलंय की, 1614.90 मिलियन टन माल वाहतूक केली तसंच सुमारे 7.3 बिलियन प्रवाशांची वाहतूक केली. त्यामुळं रेल्वेला झालेल्या नफ्यातून हे बोनस दिला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.