Pune Newe, 01 Jul : देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात पुणे शहराचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आतापर्यंत घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांमध्ये पुणे हे केंद्रबिंदू राहिले आहे. ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या अनेक वास्तू पुण्यामध्ये आहेत.
त्यामुळे पुण्याला शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जातं. याच पुण्यामध्ये आता आणखी एक ऐतिहासिक घटनांची साक्षी देणारं राष्ट्रीय दर्जाचं म्युझियम साकारलं जाणार आहे. कसबा मतदारसंघातील ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असणाऱ्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
केळकर संग्रहालयात चौदाव्या शतकापासूनच्या वीस हजारांहून अधिक वस्तूंचा संग्रहीत ठेवा आहे. सध्या जागेअभावी केवळ 11% वस्तू सध्या जनतेसाठी खुल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या विस्तारासाठी बावधन बुद्रूक येथे 6 एकर जागा सरकारकडून संग्रहालयाच्या विस्तारासाठी उपलब्ध करून देण्याबाबत आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चर नेमणुकीसाठी प्रशासकीय समितीची स्थापना, तसेच सविस्तर आराखड्यानंतर निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्याने उभारल्या जाणाऱ्या ‘म्युझियम सिटी’ला राजा दिनकर केळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्णयचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, सांस्कृतिक कार्य अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्तीय सुधारणा सचिव शैला ए, वित्त व नियोजन सचिव राजेश देशमुख तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवकालीन, पेशवेकालीन आणि पुण्याच्या (Pune) वैभवशाली वारशाच्या जतनासाठी माझा सतत प्रयत्न आहे. शनिवारवाड्यासह अनेक ऐतिहासिक वास्तूंना पुनरुज्जीवित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आजच्या निर्णयाने या प्रयत्नांचा श्री गणेशा झाला असून केळकर संग्रहालयाच्या विस्ताराचे दार खुले झाले आहे, भविष्यात या ‘म्युझियम सिटी’ची ओळख जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.