New Delhi Fire News : गुजरातमधील राजकोट शहरात शनिवारी एका गेमिंग झोनमध्ये झालेल्या भीषण आगीत नऊ लहान मुलांसह 32 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांत दिल्लीतील विवेक विहार परिसरात एक बेबी केअर सेंटर आगीच्या विळख्यात सापडले. यामध्ये सात बालकांना आपला जीव गमवावा लागला. केवळ सात तासात 16 निष्पाप मुलांचा बळी गेला. (Rajkot, Delhi Fire) दोन्ही घटनांमध्ये सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.
राजकोट अग्निकांड घडले त्यावेळी गेमिंग झोनमध्ये (Rajkoj Gaming Zone) मोठ्या प्रमाणात लोक होते. त्यामध्ये लहान मुलांची संख्याही मोटी होती. शनिवारी याठिकाणी 9 रुपयांत तिकीटाची ऑफर सुरू होती. त्यामुळे गर्दी झाली होती. त्यातच जाण्या-येण्याचा मार्गही एकच होता. त्यामुळे अचानक लागलेल्या आगीमुळे लोकांना लगेच बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे 32 जणांना आपला जीव गमवावा लागला. (Fire Incidence News)
गेमिंग झोन चालकाने अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणासाठी ना हरकत प्रमाणपत्रही (Fire NOC) घेतले नव्हते. गेमिंग झोनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचा साठा, प्लायवूड होते. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोलिसांनी (Police) याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केले आहे. तर दुसरीकडे गुजरात हायकोर्टानेही (Gujarat High Court) या घटनेची गंभीर दखल घेत ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचे म्हटले आहे. तसेच राजकोट महापालिकेकडून (Rajkot Municipal Corporation) स्पष्टीकरण मागवले आहे. या ठिकाणाची पालिका प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली होती की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दिल्लीतही एक चूक भोवली
दिल्लीतील (Delhi fire News) विवेक विहार येथील एका बेबी केअर सेंटरमध्ये (Baby Care Centre) शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यावेळी सेंटरमध्ये जवळपास बारा लहान मुले होते. त्यापैकी पाच मुलांनाच सुरक्षितपणे बाहेर काढणे शक्य झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून इतर सात मुलांचा मृत्यू झाला आहे.
सेंटरच्या तळमजल्यावर अवैधपणे सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळ सिलेंडरचा स्फोट झाला आणि संपूर्ण सेंटरमध्ये आग पसरली. अनेक दिवसांपासून हे सेंटर बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याकडेही सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.