IAS Transfer : सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, ‘सीआयडी’च्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी शशिकांत महावरकर

IAS Officer Transfer : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
shashikant mahavarkar
shashikant mahavarkar sarkarnama
Published on
Updated on

IAS Officer Transfer : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) राज्यातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी (ता. 9) काढण्यात आले.

अधिकाऱ्याचे नाव, सध्याचे आणि कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण -

  • डी. टी. शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त- पूर्व, ठाणे शहर (अतिरिक्त आयुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार).

  • संजय जाधव, अतिरिक्त आयुक्त प्रशासन ठाणे शहर (अतिरिक्त पोलिस आयुक्त-पूर्व, ठाणे शहर)

  • श्रीकांत पाठक, अतिरिक्त आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार (अतिरिक्त आयुक्त-प्रशासन ठाणे शहर).

  • अभिषेक त्रिमुखे, पोलिस उपमहानिरिक्षक- राज्य राखीव पोलिस बल मुंबई (अतिरिक्त पोलिस आयुक्त मुंबई).

  • शहाजी उमाप, अतिरिक्त आयुक्त- विशेष शाखा, मुंबई (पोलिस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र).

  • शिवाजी राठोड, अतिरिक्त आयुक्त- दक्षिण विभाग नागपूर शहर (अतिरिक्त आयुक्त- विशेष शाखा, मुंबई).

shashikant mahavarkar
Video Pooja Khedkar : ऑडीला लाल-निळा दिवा अन् अधिकाऱ्याचं कार्यालय बळकावलं; चमकोगिरी करणाऱ्या IAS ला सरकारनं दाखवला इंगा

राज्यातील 15 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

दरम्यान, राज्यातील अप्पर पोलिस महासंचाक आणि महानिरीक्षक दर्जाच्या 15 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या होत्या. गृहमंत्रालयानं जारी केल्या आदेशानुसार राज्य कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अभिताभ गुप्ता यांची अप्पर पोलिस महासंचालक (विशेष कृती, महाराष्ट्र राज्य, मुंबई) येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय अप्पर पोलिस महासंचालक (दळणवळण) सुनील रामानंद यांची अपर पोलिस महासंचालक (नियोजन व समन्यव) पदावर बदली करण्यात आली आहे. तर प्रवीण साळुंखे यांची अप्पर महासंचालक (लोहमार्ग, मुंबई) या पदी बदली करण्यात आली.

वैधमापन शास्त्राचे नियंत्रक पदावर कार्यरत सुरेश मेखला यांची अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) या पदावर बदली करण्यात आली आहे. महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागातील अप्पर महासंचालक दीपक पांडे यांची वरिष्ठ अधिकारी सुनील रामानंद यांच्या बदलीने रिक्त झालेल्या अप्पर महासंचालक (दळणवळण) या पदावर बदली करण्यात आली आहे.

shashikant mahavarkar
Marathwada Divisional Commissioner News : मराठवाडा विभागीय आयुक्तपदी दिलीप गावडेंची नियुक्ती!

पाच अप्पर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह 10 महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही सोमवारी गृह विभागाकडून काढण्यात आले होते. त्यात सुहास वारके यांची विशेष महानिरीक्षक (महिला व बाल अत्याचार), नागपूरच्या पोलिस आयुक्त अश्वती दोरजे यांची पोलिस महानिरीक्षक (नागरी हक्क संरक्षण) व विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र छेरिंग दोरजे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) या पदी बदली करण्यात आली आहे. छेरिंग दोरजे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या नागपूर परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षक पदी डी.के. पाटील-भुजबळ यांची बदली करण्यात आली आहे. तसेच, पुणे शहर सहपोलिस आयुक्त पदावर रंजनकुमार शर्मा यांची बदली करण्यात आली आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com