Video Pooja Khedkar : ऑडीला लाल-निळा दिवा अन् अधिकाऱ्याचं कार्यालय बळकावलं; चमकोगिरी करणाऱ्या IAS ला सरकारनं दाखवला इंगा

Pooja Khedkar News : खेडेकर या 2023 बॅचच्या 'आयएएस' अधिकारी आहेत. जून 2023 पासून त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता.
pooja khedkar
pooja khedkarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती झालेल्या 'प्रोबेशन' कालावधीत महिला 'आयएएस' अधिकाऱ्याकडून नियम धाब्यावर बसवून आपल्या 'व्हीआयपी' नंबर असलेल्या खासगी 'ऑडी' गाडीला त्यांनी लाल-निळा दिवा लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

ही महिला अधिकारी एवढ्यावर थांबली नाही तर एका अधिकाऱ्याच्या 'अ‍ॅण्टी चेंबर'मध्ये आपले आलिशान कार्यालय थाटले. तिथे आपल्या नावाची पाटीदेखील लावली. त्यामुळे पुणे ( Pune ) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा त्यांचाच रूबाब भारी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पुण्यातील रूबाबात चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी पूजा खेडकर ( Pooja Khedkar ) यांची राज्य सरकारने थेट वाशिमला बदली केली आहे.

'आयएएस'पदी ( IAS ) निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना दोन वर्षे शिकण्यासाठी विविध पदांवर सहा महिन्यांसाठी 'प्रोबेशन'री नियुक्ती केली जाते. 'प्रोबेशन'री अधिकाऱ्यांसाठी वाहन सुविधा अथवा त्यांना स्वतंत्र कार्यालय देण्यात येत नाही. असे असताना देखील या अधिकाऱ्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 'अ‍ॅण्टी चेंबर'मध्ये स्वतःचे कार्यालय थाटले. तसेच, त्या ठिकाणी स्वतःच्या नावाची पाटी देखील ही लावली होती.

pooja khedkar
Police Recruitment News : महिला पोलिस बनली परीक्षार्थीच्या बाळाची ‘आई’

असे आरोप समोर आलेल्या नंतर पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पूजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी करून वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे.

कोण आहेत या अधिकारी?

खेडेकर या 2023 बॅचच्या 'आयएएस' अधिकारी आहेत. जून 2023 पासून त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. मात्र, त्यांनी नियुक्तीपासूनच अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अहमदनगरमधील पाथर्डी येथील असलेल्या पूजा खेडकर या माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत.

pooja khedkar
Jogendra Katyare News : खेडचे प्रांतधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे अखेर निलंबन..!

दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर वंचित आघाडीच्या पाठिंब्यावर दिलीप खेडकर यांनी अहमदनगर दक्षिणमधून 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. तर, पूजा खेडकर यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर या देखील भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com