Teacher Recruitment 2024: शिंदे सरकारचा शिक्षकांसाठी मोठा निर्णय! तब्बल 'एवढ्या' हजार जागांची मेगा भरती करणार

Shinde Government Big Announcement over Teacher Recruitment : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात असून, शिंदे सरकार मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा भरणार आहेत.
teacher Recruitment
teacher RecruitmentSarkarnama
Published on
Updated on

Teacher Recruitment : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात असून, शिंदे सरकार शिक्षकांच्या 10 हजार जागा भरणार आहेत. जुलै महिना अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत.

ZP शाळांमध्ये साडेतीन हजार तर खासगी संस्थांमधील सहा ते साडेसहा हजार पदे जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात भरली जाणार आहेत. यामध्ये ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना याआधी पवित्र पोर्टलवर (Pravitra portal) जाहिरात अपलोड करता आली नव्हती त्यांना या वेळेस संधी मिळणार आहे.

teacher Recruitment
Police Recruitment News : महिला पोलिस बनली परीक्षार्थीच्या बाळाची ‘आई’

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील 30 टक्के रिक्त पदांपैकी 10 टक्के पदभरतीच्या जाहिराती निघणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राज्यात शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली होती. ही भरती म्हणजे शिंदे सरकारचा मास्टर स्ट्रोक मानला जात होता.

राज्य शालेय शिक्षण विभागाकडून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) करणार असल्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी सांगितले होते. मागच्या काही काळातील सर्वात मोठी शिक्षक भरती करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र ही पदभरती रखडली होती. आता यापद भरतीवर होणार आहे. या पद भरतीमध्ये ZP च्या शाळांमधील 22 हजार पदांचा समावेश आहे.

teacher Recruitment
Anil Ambani News : अनिल अंबानींवर शिंदे सरकार मेहरबान; संकटातून बाहेर पडण्यासाठी 1700 कोटींच बँकेचे कर्ज फेडणार!

जिल्हा परिषद शाळेतील शाळांमधील तीस हजार पदे भरण्यात येणार असल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी होणार आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने राज्यातील मुला-मुलींना समान व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसारच ही पद भरती जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com