Loksabha Election 2024 : सातपुड्याच्या कुशीतील तालुक्यातील दोन समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर मतदान न करण्याचा घेतला होता निर्णय. मात्र संग्रामपूर तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी दोन्ही समाजातील लोकांची समजूत काढून मतदान करण्याचे आवाहन पत्राद्वारे केले होते. त्या नुसार दुपारपर्यंत दोन्ही समाजातील लोकांनी मतदानाला यायला सुरुवात केल्याची माहिती तहसीलदार यांनी बीएलओकडून घेतली. कोळी जमात आणि गोंडगोवारी अशा दोन समाजाने मतदान करणार नसल्याचे प्रशासनाला कळविले होते.
बुलडाणा(Buldana ) जिल्ह्यातील बेरारमधील कोळी नोंदीनुसार कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासंदर्भात शासकीय स्तरावरुन व राजकीय नेत्यांकडून कार्यवाही व्हावी. अन्यथा बुलढाणा जिल्यातील बेरारमधील कोळी जमातीकडून लोकशाही मार्गाने होणाऱ्या कोणत्याही लोकसभा, विधानसभा, जिल्हा परीषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहीष्कार टाकण्यात येईल. असे निवेदन तालुक्यातील टूनकी येथील दशरथ लोणकर यांनी समाजाच्या वतीने दिले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तर दुसरे सोनाळा येथील गोंड गोवारी समाजाचे दुर्गादास पोहरे समाजातील लोकांनी निवेदन दिले होते. सदर दोन्ही समाजाच्या निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी 'सदर बाब ही वरिष्ठ शासकीय स्तरावरील असून, या कार्यालयाकडे प्राप्त होणारे जाती-जमातीचे प्रमाणपत्र करीताचे अर्ज नियमानुसार पुढील कार्यवाहीस्तव वरीष्ठ स्तरावर सादर केले जातात. जात प्रमाणत्र देण्याचे अधिकार या कार्यालयास नाहीत. त्यामुळे आपण कोणत्याही निवडणुकीवर (मतदानावर बहिष्कार टाकू नये.'
तसेच 'आपणाकडून निवेदनामधील दिलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपले निवेदन वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल, निवडणूक व मतदान हे राष्ट्रीय कार्य असल्यामुळे आपण सदर कार्यक्रमावर बहीष्कार टाकू नये राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे.', अशी विनंती तहसीलदारांनी केली होती.
त्यांच्या विनंतीवरून आणि पुढाकारातून दुपारपर्यंत दोन्ही ठिकाणी दोन्ही समाजातील लोकांनी मतदान करण्यास सुरुवात केल्याची माहिती तहसीलदार टोम्पे यांच्याकडून देण्यात आली. यामुळे मतदानावर बहिष्काराचा कलंक तालुक्याला लागला नाही असे म्हणता येईल.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.