Sharad Pawar News : शरद पवारांचा कानमंत्र घेऊन शिलेदार लागले निवडणुकांच्या कामाला!

NCP Meeting News : शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी पार पडली महत्त्वपूर्ण बैठक, जाणून घ्या नेमक काय म्हणाले पवार?
Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCP Sarakarnama
Published on
Updated on

Pune News. : विरोधकांच्या इंडिया आघाडीत सुरू असलेली पडझड, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये होत असलेला प्रवेश आणि पक्षाचे चिन्ह व नाव निवडणूक आयोगाने अजित पवारांना बहाल केल्यानंतर काहीसे नैराश्य आलेल्या शरद पवार गटाच्या नेत्यांना शरद पवारांनी आज पुण्यातील निवासस्थानी बोलावून बैठक घेत कानमंत्र दिला. शिवाय आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज होण्याच्या सूचना केल्या आहेत.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरदचंद्र पवार यांच्या मोदीबाग येथील कार्यालयात पक्षाचे सर्व माजी मंत्री, आजी-माजी लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक पार पडली.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे(Amol Kolhe), श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, आमदार रोहित पवार, संदीप क्षीरसागर शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे या बैठकीस उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar NCP
Mahavikas Aghadi : 'मविआ'चं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं ? रोहित पवारांनी थेटच सांगितलं...

निवडणूक आयोगाने घड्याळ हे पक्षाचे चिन्ह व पक्षाचे नाव अजित पवार गटाला देऊ केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ही पहिलीच मोठी बैठक होती. पक्षाचे नाव व चिन्ह यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा सुरू असला तरी प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेची शक्यता लक्षात घेता नवीन नाव व नवीन चिन्हासह आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याच्या सूचना पवारांनी उपस्थित सर्व नेत्यांना केल्या.

केंद्रात व राज्यात सुरू असलेली दडपशाही जनता बघत आहे, आपल्याला जनतेपर्यंत पोहोचून त्यांना धीर द्यायचा आहे, जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहणार. असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी पवारांनी(Sharad Pawar) प्रत्येक भागातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत अशा परिस्थितीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकींना सामोरे जाताना कशाप्रकारे रणनिती आखावी यासाठी प्रत्येकाला कानमंत्र देत आगामी निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Sharad Pawar NCP
Sharad Pawar : शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या शिलेदारांनी मांडली रोखठोक भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान माध्यमांमध्ये विविध प्रकारच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे बैठकीदरम्यान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस बाबतच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा खुलासा त्यांनी केला. "आमचा लढा हा सत्तेसाठी नसून अस्तित्वासाठी आहे. म्हणून कुठेही विलीन होण्याचा प्रश्नच नाही, आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वात लढू आणि ऐतिहासिक विजय मिळवू." असा विश्वास शहराध्यक्ष प्रशांत गताप यांनी यावेळी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com