V Radha Transfer : 'भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा...'; व्ही. राधा यांच्या बदलीवरून वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Vijay Wadettiwar On Mahayuti Government About V Radha Transfer : "कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे. भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल, असा संदेश या बदलीतून महायुतीने दिला आहे."
Vijay Wadettiwar On Mahayuti Government
Vijay Wadettiwar On Mahayuti GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Amravati News, 14 August : दोन महिन्यांपूर्वीच कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्त झालेल्या व्ही. राधा (V Radha) यांची आता सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. याच बदलीवरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे. भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल, असा संदेश या बदलीतून महायुतीने दिला आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, "प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची कार्यपद्धती जुनीच आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालून शेतकऱ्यांचं भलं करण्याची या सरकारची मानसिकता नाही. शेतकरी विरोधी सरकार असल्यानेच महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचारात बुडाला आहे."

Vijay Wadettiwar On Mahayuti Government
Congress : काँग्रेसनं बरचं काही ठरवलं; 'या' मुद्यावर महायुती सरकार घालवण्याचा निश्चय!

नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वाटपाच्या 1400 कोटी रुपयांच्या प्रस्तावावर व्ही. राधा यांनी आक्षेप घेतला होता. खतांच्या खरेदीसाठी पीएम प्रणाम योजनेतंर्गत मिळणारे अनुदान हे 250 कोटींपेक्षा जास्त मिळणार नसल्यामुळे ही योजना तूर्तास राबवली जाऊ नये, असं मत राधा यांनी व्यक्त केलं होतं.

तर शेतकरी (Farmer) सन्मान योजनेचा एक हप्ता वळवण्यासही त्यांनी विरोध होता. या योजनेतील 1400 कोटी वळविण्याला त्यांनी विरोध केला. मात्र तरीही मंत्री कार्यालयाचा निधी वळविण्याचा अट्टाहास होताच. राधा यांनी निविष्ठा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखत, फवारणी पंपाच्या खरेदीवरही त्यांनी अनेक आक्षेप घेतले होते.

Vijay Wadettiwar On Mahayuti Government
Anil Desai Politics: अनिल देसाई म्हणाले, पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच!

यामध्ये अनियमितता असून या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता, असल्याचा शेरा राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने राधा यांची बदली केली. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. ही दुर्दैवी बाब असून कृषी खात्यातील वाढलेला भ्रष्टाचार राज्याला डबघाईला आणणारा आहे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी राज्य सरकावर टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com