Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरला मतमोजणीची प्रतीक्षा; 27 फेऱ्या, 104 कर्मचारी अन् 84 टेबल...

Lok Sabha Voting Counting : औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालय, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. याकडे जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.
Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant Khaire
Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant KhaireSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Political News : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघासाठी 13 मे रोजी झालेल्या मतदानाची मोजणी चार जून रोजी होणार आहे. या मतमोजणीची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाने केली असून मतमोजणीच्या 27 फेऱ्यानंतर संभाजीनगरचा खासदार कोण? हे घोषित केले जाणार आहे. महायुतीचे संदिपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे व एमआयएमचे इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत होत आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालय, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी आठ वाजेपासून होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने सज्जता केली असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

4 जून रोजी पहाटे पाच वाजता त साडेसहाच्या दरम्यान कर्मचारी टेबलवर स्थानापन्न होऊन आपल्या साहित्याची तपासणी करतील. सकाळी ८ वाजता टपाली मतमोजणीची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता मतदान यंत्रांची मतमोजणी सुरू होईल.

मतमोजणीसाठी दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात कन्नड, औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद(पश्चिम) या तीन विधानसभा क्षेत्रासाठी कांतीलाल दांडे हे भाप्रसेचे अधिकारी निरीक्षक असून औरंगाबाद (पूर्व), गंगापूर, वैजापूर साठी किशोरीलाल शर्मा हे निरीक्षक आहेत.

तयारी पूर्ण

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात कन्नड,औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद (पश्चिम), औरंगाबाद (पूर्व), गंगापूर, वैजापूरचा समावेश आहे. प्रत्येक विधासभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी 14 टेबल लावण्यात आले आहेत. 7 टेबलची एक रांग अशा या दोन रांगा असतील. म्हणजे सहा विधानसभा क्षेत्रासाठी 84 टेबल असतील. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 104 कर्मचारी नियुक्त असतील. तर टपाली मतांच्या मोजणीसाठी 10 टेबल असून 68 कर्मचारी नियुक्त आहेत.

Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant Khaire
Sushma Andhare On Shambhuraj Desai : सभागृह, तंबाखू अन् मंत्री शंभुराज देसाई; सुषमा अंधारेंचा वर्मी घाव

अशा होणार फेऱ्या

विधानसभा मतदारसंघ निहाय असणाऱ्या मतदान केंद्रनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील.

कन्नड - 359 मतदान केंद्र - २६ फेऱ्या

औरंगाबाद (मध्य) - 316 - मतदान केंद्र- 23 फेऱ्या

औरंगाबाद (पश्चिम) - 374 मतदान केंद्र - 27 फेऱ्या

औरंगाबाद(पूर्व) - 305 मतदान केंद्र - 22 फेऱ्या

गंगापूर - 348 मतदान केंद्र - 25 फेऱ्या

वैजापूर - 338 मतदान केंद्र - 25 फेऱ्या

अशा एकूण 2040 मतदान केंद्रांसाठी सरासरी 27 फेऱ्या होतील.

Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant Khaire
Modi Sarkar and Onion Issue : केंद्र सरकारला गुजरातनंतर आता कर्नाटकचा पुळका; कांद्याबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

मतमोजणी सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय रंग सांकेतांक देण्यात आले आहेत. कन्नड- लाल, औरंगाबाद (मध्य)- पिवळा, औरंगाबाद(पश्चिम)- गुलाबी, औरंगाबाद (पूर्व)-राखाडी, गंगापूर- जांभळा तर वैजापूर- नारंगी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असून आतील व्यवस्था ही केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे असून त्याबाहेरील सुरक्षा राज्य राखीव पोलीस दलाकडे व बाह्य व्यवस्था राज्य पोलीस दलाकडे आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com