Young judge suicide news : तरुण न्यायाधीश आत्महत्या प्रकरणात महिला IAS अधिकाऱ्याचं नाव : कुटुंबियांचा खळबळजनक दावा

Aman Kumar Sharma suicide case details : तरुण न्यायाधीश अमन कुमार शर्मा आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा. कुटुंबीयांनी IAS अधिकारी निधी मलिक यांचं नाव घेत गंभीर आरोप केले. सविस्तर बातमी वाचा.
Young judge suicide news : तरुण न्यायाधीश आत्महत्या प्रकरणात महिला IAS अधिकाऱ्याचं नाव : कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Published on
Updated on

दिल्लीतील न्यायव्यवस्थेतून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. कडकडडूमा न्यायालयात कार्यरत असलेले 30 वर्षीय तरुण न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांनी सफदरजंग येथील निवासस्थानी गळफास लावून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी याला आत्महत्येचा प्रकार मानला असला, तरी कुटुंबियांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

कुटुंबीयांच्या मते, अमन कुमार शर्मा हे गेल्या 2 महिन्यांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या वडिलांनी प्रेम शर्मा यांनी असा दावा केला आहे की, घरातील वाद आणि काही प्रभावशाली नातेसंबंधांमुळे त्यांच्यावर मानसिक दबाव वाढत होता. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्यांची (मेव्हणी) साली आणि आयएएस अधिकारी निधी मलिक यांचे नाव पुढे आले आहे. अमन यांची पत्नी स्वाती या स्वतः न्यायिक सेवेत असून, घरातील निर्णयांवर निधी मलिक यांचा मोठा प्रभाव असल्याचा आरोप केला जात आहे.

घटनेपूर्वी अमन यांनी आपल्या वडिलांना फोन करून “मला खूप त्रास होत आहे, जगणं कठीण झालं आहे” असे सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एक तरुण आणि प्रतिभावान न्यायाधीश अशा प्रकारे आयुष्य संपवतो, ही बाब केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून संपूर्ण व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

Young judge suicide news : तरुण न्यायाधीश आत्महत्या प्रकरणात महिला IAS अधिकाऱ्याचं नाव : कुटुंबियांचा खळबळजनक दावा
West Bengal violence : निकाल लागताच बंगाल पुन्हा पेटलं! TMC कार्यालय खाक; निवडणुकीच्या विजयाला हिंसाचाराचं गालबोट?

दरम्यान, पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. अमन यांचे मेहुणे शिवम यांनीच घटनेची माहिती दिली होती. सध्या पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा असून, आत्महत्येमागे इतर कोणते कारण किंवा दबाव होता का, याचा शोध घेतला जात आहे.

कोण आहेत त्या आयएएस अधिकारी

निधी मलिक या 2013 बॅचच्या AGMUT कॅडरमधील वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे शैक्षणिक पार्श्वभूमी बीए आणि एलएलबी ऑनर्स अशी आहे. सध्या त्या जम्मू-काश्मीरमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यांच्या प्रभावामुळे अमन आणि त्यांच्या पत्नीमध्ये सतत वाद होत होते आणि त्यातूनच मानसिक छळ वाढत गेला.

Young judge suicide news : तरुण न्यायाधीश आत्महत्या प्रकरणात महिला IAS अधिकाऱ्याचं नाव : कुटुंबियांचा खळबळजनक दावा
BJP expansion strategy in India states : PM मोदींनी तब्बल 9 राज्यांत पहिल्यांदाच बसवले भाजपचे मुख्यमंत्री : 'या' 8 राज्यांमध्ये अजूनही संधीच्या शोधात

या प्रकरणात आणखी एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे संवाद तुटणे. अमन यांच्या कुटुंबाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काही नंबर ब्लॉक आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, काही नातेवाईकांनीही हा ‘हाय-प्रोफाइल’ विषय असल्याचे सांगत हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com