West Bengal violence : निकाल लागताच बंगाल पुन्हा पेटलं! TMC कार्यालय खाक; निवडणुकीच्या विजयाला हिंसाचाराचं गालबोट?

West Bengal election result violence news : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल लागताच हिंसाचार उसळला. TMC कार्यालय जाळण्यात आले. विजयावर हिंसाचाराचं गालबोट? सविस्तर बातमी वाचा.
West Bengal election result violence news
West Bengal election result violence newsSarkarnama
Published on
Updated on

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर होताच पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. जामुरिया विधानसभा मतदारसंघातील चुरूलिया परिसरात घडलेली घटना राज्यातील तणावपूर्ण राजकीय वातावरण अधोरेखित करते. तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यालयाला आग लावण्यात आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मतमोजणी सुरू असतानाच ही घटना घडल्याने तिचं गांभीर्य अधिक वाढलं होत. कार्यालयातून अचानक धूर निघू लागल्यानंतर काही वेळातच संपूर्ण इमारत जळून खाक झाली. सुदैवाने त्यावेळी आत कोणी नसल्याने जीवितहानी टळली, मात्र फर्निचर, कागदपत्रं आणि पक्षाशी संबंधित साहित्य पूर्णपणे नष्ट झालं. यापूर्वीही या कार्यालयावर तोडफोड झाल्याच्या घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी थेट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर वातावरण बिघडवण्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, मतदारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा घटना घडवल्या जात आहेत. दुसरीकडे विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांवर प्रतिआरोप करण्यात येत असून, संपूर्ण प्रकरण निष्पक्ष चौकशीद्वारे स्पष्ट व्हावं अशी मागणी होत आहे.

West Bengal election result violence news
BJP expansion strategy in India states : PM मोदींनी तब्बल 9 राज्यांत पहिल्यांदाच बसवले भाजपचे मुख्यमंत्री : 'या' 8 राज्यांमध्ये अजूनही संधीच्या शोधात

सतत वाढत असलेल्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झालं आहे. जामुरिया या ठिकाणी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आला असून, केंद्रीय सुरक्षा दलांकडून फ्लॅग मार्च सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com